राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरेंनी एक मुलाखतीत उद्धव ठाकरे सोबत एकत्र येण्यावर भाष्य करत म्हटलं, “एकत्र येणं आणि एकत्र राहणं, यात कठीण काही नाही, पण ते फक्त इच्छाशक्तीवर आधारित आहे. यावरून राजकीय वर्तुळात राज-उद्धव युतीच्या शक्यतेबद्दल चर्चा वाढली आहे.याच दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं, “अटी-शर्ती घालून राज ठाकरेंना एकत्र येण्यास उद्युक्त करणं म्हणजे त्यांना कमी लेखणं होईल.” सामंतांनी स्पष्टपणे सांगितले की,राज ठाकरे हे इतके छोटे व्यक्तिमत्त्व नाहीत.
उदय सामंत पुढे म्हणाले, “राज ठाकरे हे स्वतंत्रपणे आपला पक्ष चालवतात आणि त्यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्राने मान्यता दिली आहे. अशा स्थितीत त्यांना अटी घालून एकत्र येण्याची मागणी करणं म्हणजे त्यांच्या नेतृत्वाचा अपमान आहे.” तर राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी जी अट घातली ती कमी लेखण्यासाठी टाकली आहे. पण राज ठाकरे एवढे कमकुवत नाहीत की ते अशी अट मान्य करून कोणाबरोबर जातील, असं स्पष्टपणे उदय सामंत म्हणाले.अशाप्रकारे, राज ठाकरेंच्या नेतृत्वावर वाद चालू असून, युतीची चर्चा भविष्यात कोणती वळण घेईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *