”काँग्रेसने भूतकाळात अनेक चुका केल्या आहेत, त्याची जबाबदारी मी स्वीकारतो”, असे विधान काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे.अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी 21 एप्रिल रोजी ब्राऊन विद्यापीठात एका संवाद सत्रात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. माजी पंतप्रधान तथा त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 साली झालेल्या शीख विरोधी दंगलीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नवर ते बोलत होते. ते म्हणाले ‘भूतकाळात काँग्रेसने अनेक चुका केल्या, त्यावेळी आपण राजकारणात सक्रिय नव्हतो. परंतु जेकाही चुकीचे घडले त्याची जबाबदारी स्वीकारण्यात आनंद वाटेल, असं ते म्हणाले.
विद्यापीठातील संवाद सत्राचा व्हिडीओ व्हँट्सन इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्सने सोशल मीडियावरील आपल्या चॅनेलवर शनिवारी अपलोड केला. संवादादरम्यान एका शीख विद्यार्थ्याने १९८४ च्या दंगलींचा उल्लेख करून या समुदायाला जोडण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारला होता. यापूर्वच्या अमेरिका दौऱ्यावर त्यांनी म्हटले होते की, “भारतात शीख समुदायास पगडी धारण करण्याची परवानगी असेल की नाही, या गोष्टीसाठी मी ही लढाई लढत आहे. याचा उल्लेख संबंधित विद्यार्थ्याने यावेळी ‘केला होता, यावर ते म्हणाले, ‘कोणतीही गोष्ट शीख समाजात भीती निर्माण करेल असे मला वाटत नाही, मीजे वक्तव्य केले होते त्यात म्हटले होते की, जेथे लोक
आपला धर्म व्यक्त करण्यास धजावत नाहीत असा भारत हवा आहे का ?”
इतकंच नाही तर पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, 1980 च्या दशकात जे काही घडलं ते सर्वस्वी चुकीचे होते, हे आपण अनेकदा जाहीररीत्या सांगितले आहे. मी अनेकदा सुवर्णमंविरात गेलो आहे. संपूर्ण भारतातील शीख
समुदायाशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, सर्वच महान नेते, समाजसुधारक, श्री गुरुनानक, श्री महात्मा बसवेश्वर, नारायण गुरू, महात्मा फुले, महात्मा गांधी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आदी लोक म्हणजे आपला- जनतेचाचं आवाज आहेत. आपली सर्व पौराणिक व्यक्तिमत्त्च, भगवान श्रीराम क्षमाशील आणि दयाळू होते. हिंदूविचारांना मी अधिक बहुलवादी, प्रेमळ, सहिष्णु विचार मानतो. भाजपच्या विचारांना मी हिंदू संकल्पनेच्या रूपात पाहत नाही. विचारांच्चा दृष्टीने तो वेगळा गट आहे.तो मुख्य प्रवाहात नाही, असं देखील राहुल गांधी म्हणाले.
Leave a Reply