ऑपरेशन सिंदूरवर काय म्हणाले असदुद्दीन औवेसी?

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात तीव्र रोष निर्माण झाला होता. पाकिस्तानी दहशतवाद्याना प्रत्युत्तर द्या, अशी भावना देशवासियांची झाली होती. यादरम्यान मंगळवारी मध्यरात्री भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत 9 ठिकाणी हवाई हल्ले करत दहशतवादी अड्डे उडवले. त्यानंतर पहलगामचा बदला घेतल्याबद्दल देशभरातून भारतीय सैन्याचे आभार मानले जात आहे. त्यात आता एमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन औवेसी यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी या हल्ल्याचा स्वागत करत पाकिस्तानला असाच धडा शिकवला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.

 

असदुद्दीन औवेसी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर पोस्ट केली आहे. असदुद्दीन औवेसी म्हणाले की, ” पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर आमच्या सैन्यानं केलेल्या हल्ल्यांचं मी स्वागत करतो. पाकिस्तानी डीप स्टेट असाच धडा शिकवला पाहिजे, जेणेकरुन दुसरी पहलगामसारखी घटना कधीही घडणार नाही. पाकिस्तानच्या दहशतवादी पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट केल्या पाहिजेत, जय हिंद!” असदुद्दीन औवेसी यांच्या आधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही ट्विटरवर पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी पहाटे भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करून बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा गटांच्या मुख्यालयांना लक्ष्य केलं.

 

काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्य दलानं मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांची नऊ तळं उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली. भारतीय वायू दलानं (Air Force) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. महत्त्वाची बाब म्हणजे, या मोहिमेत भारतीय सैन्यानं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष्य साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं आहे. भारतीय सैन्याच्या गौरवास्पद कामगिरीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *