- जालना : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जून महिन्यात संभाजी नगर येथे ओबीसी मेळावा पार पडणार आहे. काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी जालना येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केंद्र सरकारने जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून, ती लवकर व्हावी यासाठी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार असून, लवकरच त्याची तारीख आम्ही जाहीर करू. या मेळाव्याला केंद्र सरकारचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत. व केंद्र सरकार व राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सकारात्मक नसून, हे निष्क्रिय सरकार असल्याचे टीका त्यांनी यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकार वरती केली आहेत. इतकंच नाही तर भानुदास माळी यांनी येथे सांगितले की जनगणनेचा केंद्राने हा निर्णय जाहीर जरी केला असला, तरी त्याची शास्त्रीय पद्धत, आर्थिक तरतूद आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे आमचा यावर विश्वास बसत नाहीं. देशात जवळपास साडेतीन ते चार हजार जाती असून, त्यांची जनगणना कोणत्या खात्यामार्फत करणार याबाबत काहीही स्पष्टता नाही, असं ते म्हणाले.
Please follow and like us:
Leave a Reply