अरविंद केजरीवालांचे नितीश कुमारांना पत्र, जेडीयूने दिले सडेतोड उत्तर

संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या विधानावरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) नेते अरविंद केजरीवाल यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले होते. या पत्राला उत्तर देताना जनता दल (युनायटेड) JD(U)चे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी शुक्रवारी केजरीवालांवर टीका करत प्रत्युत्तर दिले.संजय झा यांनी त्यांच्या पत्रात लिहिले की, “तुमच्या वेदना मला समजतात कारण गृहमंत्री अमित शाह यांनी त्या दिवशी संसदेत तुमच्या आघाडीच्या नेत्यांची आणि त्यांच्या पक्षाची पोलखोल केली होती.”
अमित शाह यांनी डॉ. आंबेडकरांवर केलेल्या विधानाबाबत केजरीवाल यांनी गुरुवारी नितीश कुमार यांना पत्र लिहिले होते. पत्रात केजरीवाल यांनी म्हटले “बाबा साहेब केवळ नेता नाहीत, तर या देशाचे आदर्श आहेत.”यावर उत्तर देताना संजय झा यांनी लिहिले, “बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लिहिलेले ; तुमचे खरे दु:ख समजू शकतो. तुमची वेदना ही आहे की, त्या दिवशी संसदेत गृहमंत्री अमित शाह तुमच्या आघाडीच्या नेत्यांची आणि त्यांच्या पक्षाच्या कुटुंबीयांची पोलखोल करत होते. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांशी जे दुर्व्यवहार केले, ते अक्षम्य आहे.”

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *