२६/११ चा मुंबईतील दहशतवादी हल्ला भारतीय विसरले नाहीत. या हल्ल्यातील कॅनडात राहणारा पाकिस्तानी अतिरेकी तहव्वुर राणा याला लवकरच भारताकडे सोपवण्यात येणार आहे. भारतीय कुटनीतीचे हे मोठं यश मानण्यात येत आहे. त्याला भारतात आणण्यासाठी आता कायदेशीर बाबींसोबतच राजकीय संबंधांचा वापर करण्यात येत आहे. अमेरिकन कोर्टाने राणाची याचिका फेटाळल्यानंतर त्याला मोठा झटका बसला होता. ऑगस्ट २०२४ मध्ये अमेरिकन न्यायालयाने प्रकरणात फैसला सुनावला होता. भारत-अमेरिका या दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण संधी अंतर्गत त्याला भारताकडे सोपवण्यास न्यायालयाने मंजूरी दिली होती. त्याअंतंर्गतच राणाल भारतात आणण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.
मुंबई हल्ल्यात तहव्वुर राणा याचा हात असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले होते. दोषारोपपत्रात सुद्धा त्याचे नाव आहे. तो पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेज इंटेलिजेंस(ISI) आणि द लष्कर-ए-तयब्बाचा सक्रिय सदस्य असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड डेव्हिड कोलमॅन हेडली याला राणाने या हल्ल्यासाठी मदत केल्याचे तपासात समोर आले होते. त्याने हल्ल्यापूर्वी मुंबईतील काही ठिकाणांची रेकी केली होती, असा आरोप आहे. २६/११ मुंबई हल्ल्यानंतर एका वर्षानंतर एफ बी आयने शिकागो येथून राणाला अटक केली होती. राणा आणि त्याचा मित्र डेव्हिड हेडली या दोघांनी मुंबईत हल्ल्याच्या ठिकाणांची रेकी केली होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी हे हल्ले केल्याचे तपासात समोर आले होते. अमेरिकन कोर्टाने भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रर्त्यापण करारात राणा याला नियमांच्या अपवादाचा लाभ देता येणार नाही असे स्पष्ट केले होते. अमेरिकन न्यायालयात राणा विरोधात जो खटला सुरू आहे, तो भारतातील खटल्यांपेक्षा वेगळा असल्याचे मत कोर्टाने व्यक्त केले होते. त्यामुळे भारतात नपाठवण्या संदर्भात आरोपीने केलेला युक्तीवाद कोर्टाने ग्राह्य धरला नाही. ऑगस्ट २०२४ मध्ये अमेरिकन न्यायालयाने प्रकरणात फैसला सुनावला होता. भारत-अमेरिका या दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण संधी अंतर्गत त्याला भारताकडे सोपवण्यास न्यायालयाने मंजूरी दिली होती. त्यातंर्गतच आता राणाला भारताच्या हवाली करण्यात येईल. हे मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरण नीतीचे यश मानले जाते.
Leave a Reply