राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, राज्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीत म्हणणं आता अनिवार्य असेल. अनेक शाळांमध्ये याबाबतची अंमलबजावणी अद्याप होताना दिसत नाही. त्यामुळे यापुढे सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीताबरोबर राज्यगीतही सक्तीचं असेल, असे भुसे यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक शाळेत मराठी शिकवणं सक्तीचं असेल, असेही त्यांनी नमूद केले.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे स्वागत लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि सचिवांच्या हस्ते होणार आहे. २१ व्या शतकातील ई-माध्यमांचा विषयही प्रभावीपणे शाळांमध्ये राबवला जाईल. पुढील शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई बोर्डातील निवडक चांगल्या गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठीचे नियोजन पूर्ण झाले असून, यावर्षी शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण दिले जाईल. पुढील वर्षीपासून निवडक अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू होईल, असे भुसे यांनी सांगितले.
संजय राऊतांनी स्वत:च्या तोंडाला लगाम घालावा
संजय राऊतांनी स्वत:च्या तोंडाला आवर किंवा लगाम घातला तर कोण समोरुनही बोलणार नाही. त्यांची दररोजची प्रतिक्रिया पाहता त्यांना अशा गोष्टींनी सामोरे जावे लागते. राहिला विषय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांचे हिंदुंचे दैवत आहेत त्यांच्यावर सर्वांच अधिकार आहे एका कुटुंब एका व्यक्तीचा अधिकार नाही. कदाचित रक्ताचं नात म्हणून ते वारसदार असतील मात्र विचारांचे वारसदार राज्यातील नागरिक लाखो करोडो शिवसैनिक आहेत असे भुसे म्हणाले. स्मारकावर आता अध्यक्ष कोण आहेत याची मला सविस्तर माहिती नाही माहिती घेऊन बोलेण असेही भुसे म्हणाले.
Leave a Reply