१५ जानेवारी २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इस्कॉन मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर खारघरमध्ये वाहतूक नियंत्रण उपाय लागू करण्यात आले आहेत. हे उपाय सुरळीत वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी अपेक्षित मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी करण्यात आले आहेत.
उद्घाटन समारंभ संध्याकाळी पाच वाजता सुरू होईल आणि त्यासाठी अधिकारी, मान्यवर, राजकीय नेते, तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून वाहतूक नियंत्रण उपाय लागू होतील. यामध्ये वाहनांच्या प्रवेशावर बंदी, मार्ग बदल, तसेच मंदिराच्या परिसरात नो-पार्किंग झोनची घोषणा केली जाईल. ओवे गाव पोलीस स्टेशन ते जे कुमार सर्कल आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ग्रीन हेरिटेजपर्यंतच्या परिसरात वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये केवळ व्हीआयपी वाहन, पोलिस, आपत्कालीन सेवा, सरकारी वाहने आणि कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांना प्रवेश दिला जाईल.
- प्रशांत कॉर्नरकडून ओवे गाव पोलीस स्टेशनकडे येणारी वाहने ओवे गाव चौकातून डावीकडे वळतील.
- ओवे गाव चौकातून जे कुमार सर्कलकडे जाणारी वाहने प्रशांत कॉर्नरकडून उजवीकडे वळतील.
- शिल्प चौकातून जे कुमार सर्कलकडे जाणारी वाहने ग्रीन हेरिटेज चौकात जाऊन वळतील.
- ग्रीन हेरिटेज चौकातून ग्राम विकास भवनाकडून बी.डी. सोमाणी शाळेकडे जाणारी वाहने सरळ जाऊ शकतील.
- सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशनपासून ओवे गाव पोलीस स्टेशनकडे जाणारी वाहने उजवीकडे वळून पुढे जाऊ शकतात.
- गुरुद्वारा चौक ते जे कुमार सर्कल आणि बी.डी. सोमाणी शाळेपर्यंत एक नवीन प्रवेश बंदी लागू होईल. या बंदीला व्हीआयपी आणि आपत्कालीन वाहने सूट देण्यात येईल.
इस्कॉन मंदिर गेट क्रमांक ०१ आणि गेट क्रमांक ०२ दरम्यान प्रवेश बंदी लागू केली जाईल. यामध्ये फक्त व्हीआयपी, पोलिस, सरकारी आणि आपत्कालीन सेवा वाहनेच सूट घेतील.
अनेक ठिकाणी नो-पार्किंग झोन म्हणून घोषित केले जातील. यामध्ये हिरानंदानी ब्रिज जंक्शन ते उत्सव चौक, ग्राम विकास भवन, गुरुद्वारा, ओवे गाव चौक, ओवे गाव पोलीस स्टेशन, इस्कॉन गेट क्र. ०१ आणि इतर काही प्रमुख ठिकाणी यांचा समावेश आहे. वाहतूक पोलिसांनी सर्व नागरिकांना आणि प्रवाश्यांना सूचित केले आहे की, या सर्व उपायांची अंमलबजावणी १५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपासून कार्यक्रमाच्या समाप्तीपर्यंत केली जाईल. प्रवाश्यांना विलंब आणि गैरसोय टाळण्यासाठी त्यांच्या प्रवासाच्या मार्गांची पूर्वसूचना घेतली पाहिजे. हे सर्व उपाय जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी, पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका, सरकारी वाहने आणि इतर आपत्कालीन सेवा वाहने लागू होणार नाहीत.
Leave a Reply