वसईतील माणिकपूर येथील वायएमसीए सभागृहात १८ जानेवारीला ‘साहित्य जल्लोष’ संमेलन रंगणार आहे. यंदा प्रतिष्ठानने या महोत्सवाच्या २२व्या वर्षाचा उत्साह वाढवण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी केली आहे. भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
परिसंवाद, कवी संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
यंदा ‘साहित्य जल्लोष’मध्ये परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साहित्यप्रेमींना आनंददायी अनुभव मिळणार आहे. दुसऱ्या सत्रात “अभिजात मराठी भाषा आणि आपली जबाबदारी” या विषयावर परिसंवाद होईल. महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे, संपादक महेश म्हात्रे, डॉ. प्रदीप सामंत, संजय पाटील, फा. सॅबी कोरिया, आणि लेखिका राण दुर्वे हे परिसंवादात सहभागी होणार आहेत. तिसऱ्या सत्रात प्रिया कलिका बापट, मराठी एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप सामंत, हेमांगी नेरकर यांसारख्या कविंच्या कविता ऐकण्याचा आनंद रसिकांना घेता येईल.
चौथ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत “गर्जा महाराष्ट्र माझा” हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.
विद्यार्थी स्पर्धा: साहित्याला नवीन पिढीची जोड.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी १७ जानेवारी रोजी कथाकथन आणि कविता सादरीकरण स्पर्धा होणार आहे. आयोजकांनी जास्तीत जास्त रसिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
ग्रंथदिंडी, ग्रंथप्रकाशन आणि पारितोषिक वितरण सोहळा
सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यानंतर ग्रंथप्रकाशन आणि पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे.
‘साहित्य जल्लोष’चे आकर्षण वाढते; वसईत साहित्य प्रेमींसाठी पर्वणी
साहित्य, काव्य, आणि संस्कृती यांचा संगम असलेल्या ‘साहित्य जल्लोष’मुळे वसई पुन्हा एकदा साहित्यप्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.

वसईत शनिवारी ‘साहित्य जल्लोष’चा उत्साह; २२ वर्षांची परंपरा!
•
Please follow and like us:
Leave a Reply