२०२५ साठी जगातील सर्वोत्तम शहरांची यादी; मुंबई टॉप ५० मध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय शहर

प्रत्येक वर्षी टाइम आउट संस्थेच्या माध्यमातून जगभरातील हजारो लोकांकडून सर्वेक्षण घेतले जाते आणि जगातील सर्वोत्तम शहरांची निवड केली जाते. २०२५ साठीच्या यादीत खाद्यसंस्कृती, कला, नाईटलाईफ, स्वस्ताई आणि राहणीमान यांसारख्या विविध निकषांवर आधारित शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

केप टाउन
वैशिष्ट्य: अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाणारे केप टाउन ब्लू फ्लॅग समुद्रकिनारे, वाइनयार्ड्स, रंगतदार नाईटलाईफ आणि ऐतिहासिक वारसा यासाठी प्रसिद्ध आहे. हे शहर उत्कृष्ट खाद्यसंस्कृतीमुळे जगभरात ओळखले जाते.
आता भेट द्या कारण: डर्बनव्हिल वाईन व्हॅलीमधील वाईन सफारी आणि V&A वॉटरफ्रंटच्या टाइम आउट मार्केटमध्ये खाद्ययात्रेचा आनंद घ्या.
स्थानिकांचे मत: ९५% स्थानिकांनी केप टाउनच्या खाद्यसंस्कृतीचे कौतुक केले असून ९७% नागरिक या शहराने त्यांना आनंदी केले असल्याचे सांगतात.

बँकॉक
वैशिष्ट्य: समृद्ध संस्कृती, अप्रतिम खाद्यपदार्थ आणि ऊर्जावान वातावरण यामुळे बँकॉक जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. भव्य मंदिरे, जीवंत बाजारपेठा आणि अतिथींसाठी उबदार स्वागत ही या शहराची खास वैशिष्ट्ये आहेत.
आता भेट द्या कारण: बँकॉक आर्ट बिएनाले फेब्रुवारीपर्यंत सुरू असून आधुनिक कला प्रदर्शन आणि कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे.
स्थानिकांचे मत: ८६% स्थानिकांना बँकॉकची खाद्यसंस्कृती अप्रतिम वाटते आणि ८४% लोक बाहेर खाणे परवडणारे असल्याचे सांगतात.

न्यू यॉर्क
वैशिष्ट्य: नेहमी गजबजलेले, सतत बदलणारे आणि विकसित होणारे न्यू यॉर्क हे जागतिक आकर्षणांसाठी प्रसिद्ध आहे. उत्कृष्ट कला, नाईटलाईफ आणि सांस्कृतिक अनुभव यामुळे हे शहर विशेष ठरते.
आता भेट द्या कारण: २०२६ फिफा वर्ल्ड कप आणि विविध क्रीडास्पर्धांमुळे न्यू यॉर्क क्रीडाप्रेमींसाठी केंद्रस्थानी आहे.
स्थानिकांचे मत: ९२% स्थानिक न्यू यॉर्कच्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्राचे कौतुक करतात, तर ७८% लोक या शहराला सर्वाधिक उत्साही मानतात.

मेलबर्न
वैशिष्ट्य: मेलबर्नची खाद्यसंस्कृती, रस्त्यावरील कला आणि लाइव्ह म्युझिक हे नेहमीच लोकप्रिय राहिले आहे. येथील हिरव्या जागांचे व्यवस्थापन, वेलनेस हब्स आणि मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे शहर सातत्याने प्रगत होत आहे.
आता भेट द्या कारण: मेलबर्नमधील NGV येथे ययई कुसामाच्या कलाकृतींचा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रदर्शित संग्रह पाहता येईल.
स्थानिकांचे मत: मेलबर्न हे रेस्टॉरंट्ससाठी दुसऱ्या क्रमांकावर आणि सांस्कृतिक श्रेणीत चौथ्या स्थानावर आहे.

लंडन
वैशिष्ट्य: लंडन हे विविध संस्कृतींचे संगम आहे. इथे खाद्यसंस्कृतीपासून ऐतिहासिक ठिकाणांपर्यंत आणि नाईटलाईफपासून नवनवीन अनुभवांपर्यंत बरेच काही अनुभवता येते.
आता भेट द्या कारण: नवीन पिकाडिली लाइन ट्रेन आणि व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातील डेव्हिड बॉवी सेंटर यांचा आनंद घ्या.
स्थानिकांचे मत: ९२% लोक शहराच्या विविधता आणि समावेशकतेचे कौतुक करतात.

मुंबई
वैशिष्ट्य: मुंबई ही एक भावना आहे. चित्रपटसृष्टीच्या झगमगाटासोबत समुद्राच्या शांततेचा मेळ या शहरात अनुभवता येतो. ऐतिहासिक वर्ली कोळीवाड्यापासून कला घोडा जिल्ह्यापर्यंत, जुन्या आणि नव्या परंपरांचा मिलाफ येथे पाहायला मिळतो.
आता भेट द्या कारण: मुंबईची रस्त्यावरील वडापावसारखी खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. बॉम्बे डाक येथे प्रादेशिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेता येतो.
स्थानिकांचे मत: ७२% स्थानिकांच्या मते मुंबई ही रोमांससाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. तसेच आनंदी राहण्याच्या क्रमवारीत हे शहर जगभरात तिसऱ्या स्थानावर आहे

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *