पुण्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक भीषण आग लागून चौघांचा बळी गेला. ही दुर्घटना हृदय पिळवटून टाकणारी होती. मात्र, या आगीत केवळ अपघात नसून नियोजित कट असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ही बस स्वतः चालकानेच पेटवून दिली होती
या दुर्घटनेमागील कारण अधिक धक्कादायक आहे. बसचा चालक जनार्दन हंबारडीकर यानेच रागाच्या भरात ही बस पेटवून दिली. त्याला कंपनीतील कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादाचा राग होता आणि दिवाळीमध्ये पगार कापल्याने तो अधिक चिडलेला होता. त्यामुळे प्रतिशोध म्हणून त्याने हा कट रचला आणि थेट निर्दोष कर्मचाऱ्यांचा जीव घेतला
पोलीस तपासात उघड झाले की, या घटनेच्या आदल्या दिवशीच हंबारडीकर याने कंपनीतून बेंझिन नावाचे केमिकल गाडीत ठेवलं होतं. तसेच, टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही ठेवल्या होत्या. हिंजवडीजवळ येताच त्याने काडीपेटीने चिंध्या पेटवल्या आणि केमिकलमुळे बसने क्षणार्धात पेट घेतला. या प्रकरणाचा तपास करताना आरोपीनेही गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली.
हिंजवडीजवळ कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली. त्यांनी काही केल्या बाहेर पडता आलं नाही. आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. समोरील दृश्य, जीव वाचवण्यासाठीची धडपड, वाहनाचा जळून झालेा कोळसा अन् भाजलेले कर्मचारी पाहून प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आलं
या भीषण दुर्घटनेत ज्या कर्मचाऱ्यांनी प्राण गमावले त्यांची नावे अशी आहेत – सुभाष भोसले (वय ४२), शंकर शिंदे (वय ६०),गुरुदास लोकरे (वय ४०),राजू चव्हाण (वय ४०)
पण, या वाहनाला आग लागली तरी कशी? या टेम्पो ट्रॅव्हलरचे मेंटेनन्स झाले नव्हते का असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.
Leave a Reply