मुंबई – अमेरिकन कॉन्सुलेट जनरल मुंबईने, काल ‘दोस्ती हाऊस’च्या ८० वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा उत्सव साजरा केला. यापूर्वी ‘अमेरिकन सेंटर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जागेने मुंबईच्या सांस्कृतिक आणि वैचारिक जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. १९४४ साली, मुंबईत उघडण्यात आलेल्या दोस्ती हाऊसने ज्ञान, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि मुक्त संवादासाठी पिढ्यान्पिढ्या मुंबईकरांना एकत्र आणणारे केंद्र म्हणून महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे.
हा कार्यक्रम भूतकाळावर चिंतन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्याचा संकल्प होता. एका विशेष छायाचित्र प्रदर्शनातून दोस्ती हाऊसच्या इतिहासाचा आढावा घेण्यात आला – अमेरिकन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (USIS) पासून आधुनिक अमेरिकन स्पेसपर्यंतच्या प्रवासाचे दर्शन या प्रदर्शनातून घडले. पब्लिक डिप्लोमसीसाठी मंत्री सल्लागार ग्लोरिया बर्बेना यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांनी भारत-अमेरिका संबंधांतील सांस्कृतिक नात्यांचे महत्त्व अधोरेखित केले आणि दोस्ती हाऊस हे या नात्याचे प्रतीक असल्याचे सांगितले.
“दोस्ती हाऊस आणि इतर अमेरिकन स्पेसेसच्या उल्लेखनीय प्रवासाचे चिंतन करताना, आम्ही अशा भविष्याकडे पाहतो जिथे ही केंद्रे नाविन्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत राहतील. दोस्ती हाऊसच्या कार्यक्रमांमध्ये तुमच्या सहभागातून भारत – अमेरिका संबंधांची ही प्रवासगाथा पुढे लिहिण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो,” असे बर्बेना यांनी सांगितले.
कार्यक्रमातील विशेष क्षण म्हणजे कवी रोशेल पोटकर, अभ्यासक कविता पीटर, आणि विद्यापीठातील विद्यार्थिनी प्रियांका यादव यांच्यासारख्या सदस्यांचे अनुभव. एक हृद्य क्षण होता १९५० च्या दशकात अमेरिकन लायब्ररीमध्ये सहभागी झालेल्या सदस्याची भेट नुकतेच सदस्यत्व घेतलेल्या नवीन सदस्याशी झाली. त्यांच्या कथांनी दोस्ती हाऊसच्या पिढ्या जोडणाऱ्या सामर्थ्याचे दर्शन घडवले आणि विविध संस्कृतींविषयी अधिक समज उत्पन्न केली. निवृत्त न्यायमूर्ती रोशन दळवी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये डॉ. सुसन ई. मॅझर (हार्प वादक), डॅलस स्मिथ (वुडविंड वादक) आणि कथक नर्तकी अदिती भागवत यांचा एकत्रित सांस्कृतिक सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. याशिवाय, दीर्घकाळापासून जोडलेले सदस्य आणि नवीन सहभागी यांचे अनुभव स्क्रीनवर दाखवण्यात आले. दोस्ती हाऊसने त्यांच्या आयुष्यात कसा सकारात्मक बदल घडवला, याचे अनुभव त्यांनी कथन केले.
या आनंदप्रसंगी, दोस्ती हाऊस २०२४ डिसेंबर ते २०२५ डिसेंबर दरम्यान केवळ रु. ८०/- मध्ये सदस्यत्व देत आहे. याशिवाय, वर्षभर चालणाऱ्या दोस्ती क्विझच्या माध्यमातून सहभागी होणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या:
https://www.instagram.com/usconsulategeneralmumbai/
Leave a Reply