Author: Mustan Mirza
-
काँग्रेसची ठाकरे-पवार यांच्यासोबतच युतीची चर्चा: पृथ्वीराज चव्हाण यांचे महत्त्वाचे विधान
•
नवी दिल्ली: महाराष्ट्रात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकांमध्ये केवळ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील…
-
धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव: १४ जुलै रोजी सुनावणी
•
नवी दिल्ली: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (उद्धवसेना) बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा मांडण्यात आला. खंडपीठाने या याचिकेवर…
-
मुंबई विद्यापीठाची नाचक्की: पदवी प्रमाणपत्रावरील चुकीच्या स्पेलिंगमुळे कंत्राटदाराला दंड
•
मुंबई: मुंबई विद्यापीठाने लाखो विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर ‘मुंबई’ या नावाच्या स्पेलिंगमध्ये झालेल्या गंभीर चुकीबद्दल कंत्राटदाराला दणका दिला आहे. विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर केलेल्या कारवाईत, कंत्राटदाराला एकूण कराराच्या २०% किंवा १० लाख रुपये, यापैकी जी रक्कम अधिक असेल, तो दंड ठोठावण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठाची मोठी नाचक्की झाली असून, विद्यार्थ्यांमध्येही संतापाचे वातावरण…
-
कोरोना लस आणि हृदयविकाराचा संबंध नाही: ICMR आणि एम्सच्या अभ्यासात निष्कर्ष
•
नवी दिल्ली: कोरोना लसीकरणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, अशा अफवा आणि दाव्यांना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) केलेल्या एका महत्त्वपूर्ण अभ्यासाने पूर्णविराम दिला आहे. या अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की, कोरोना लसीकरण आणि हृदयविकाराने होणारे मृत्यू यांचा कोणताही थेट संबंध नाही. केंद्र सरकारने बुधवारी…
-
बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या: दोन पोलिसांसह एजंटला अटक
•
नालासोपारा: नालासोपारा येथे बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश चौहान (६१) यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या चौहान यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये, कर्जाच्या वसुलीसाठी दोन पोलीस कर्मचारी मानसिक छळ करत असल्याचे नमूद केले होते. या प्रकरणी आचोळे पोलिसांनी दोन पोलीस हवालदार श्याम शिंदे आणि राजेश महाजन यांच्यासह…
-
महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
•
मुंबई: महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत सलग दुसऱ्या दिवशी अभूतपूर्व गदारोळ झाला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत तातडीने या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली, मात्र ती फेटाळल्याने संतप्त विरोधी पक्षांनी सभात्याग केला. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “शेतकऱ्यांना भिकारी संबोधले जात…
-
आमदारांच्या बनावट लेटरहेड आणि AI आवाजाचा वापर करून ३ कोटींचा निधी पळवण्याचा प्रयत्न उघड
•
मुंबई: महाराष्ट्रात आमदारांच्या बनावट लेटरहेड, सह्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) तयार केलेल्या आवाजाचा वापर करून कोट्यवधी रुपयांचा निधी बळकावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या लेटरहेड आणि AI आवाजाचा वापर करून ३ कोटी १० लाखांचा निधी बीड जिल्ह्यात वळवण्याचा प्रयत्न झाला. अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस…
-
भुमरे यांच्या चालकाची नऊ तास चौकशी: १५० कोटींच्या जमिनीचा वाद चिघळला
•
छत्रपती संभाजीनगर: खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांची आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी तब्बल नऊ तास कसून चौकशी केली. शहरातील कोट्यवधी रुपयांच्या जमीन व्यवहारावरून ही चौकशी सुरू असून, जावेदला मिळालेल्या कथित बक्षीस स्वरूपातील जमिनीवरून वाद पेटला आहे. याप्रकरणी सालारजंग कट्रबातील वंशज मीर महेमूद अली…
-
बुधवारपासून वाहतूकदारांचा ‘चक्का जाम’ आंदोलन: ३० हून अधिक संघटनांचा सहभाग
•
पिंपरी (जि. पुणे) : ‘ई-चालान’ प्रणाली विरोधात राज्यातील माल आणि प्रवासी वाहतूकदारांनी बुधवारी मध्यरात्रीपासून बेमुदत ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारले आहे. असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्सच्या अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या आंदोलनात राज्यातील ३० पेक्षा जास्त वाहतूक व्यावसायिक संघटना सहभागी झाल्या आहेत.असोसिएशनचे कार्याध्यक्ष गौरव कदम यांनी सांगितले की,…
-
धनंजय मुंडेंच्या आरोपांवर संदीप क्षीरसागरांचा पलटवार: “मी त्यांच्यासारखा १५० दिवस पळून गेलो नाही!”
•
बीड: बीडमधील एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये ‘नीट’ ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना संदीप क्षीरसागर यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आरोपी विजय पवार हा क्षीरसागर यांचा निकटवर्तीय…