Author: Mustan Mirza

  • कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाची चर्चेला उधाण; डी.के. शिवकुमारांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले

    कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाची चर्चेला उधाण; डी.के. शिवकुमारांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले

    कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी लवकरच प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे संकेत दिल्याने कर्नाटकातील काँग्रेसमधील नेतृत्वबदलाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. बंगळुरू येथे इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले, “मी या पदावर कायम राहू शकत नाही. साडेपाच वर्षे झाली आहेत… आता इतर नेत्यांनाही संधी दिली पाहिजे.”…

  • राज्यपालांच्या अधिकारांवरील डेडलाईन हटली; विलंब करू नयेत, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

    राज्यपालांच्या अधिकारांवरील डेडलाईन हटली; विलंब करू नयेत, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

    सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय संविधान पीठाने आज महत्त्वपूर्ण निर्णय देत राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या विधेयकांवरील निर्णय प्रक्रियेवर वेळेची बंधने घालता येणार नाहीत, असे स्पष्ट केले. राज्य विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी कोणतीही कायदेशीर वेळ-सीमा निश्चित करता येणार नाही, मात्र अनावश्यक किंवा अनिश्चित विलंब झाल्यास न्यायालय हस्तक्षेप करू शकते, असे…

  • ऐश्वर्या राय बच्चनचा मानवतेचा संदेश; सत्य साईबाबा शताब्दी सोहळ्यात पंतप्रधान मोदींसमोर केलं भाषण

    ऐश्वर्या राय बच्चनचा मानवतेचा संदेश; सत्य साईबाबा शताब्दी सोहळ्यात पंतप्रधान मोदींसमोर केलं भाषण

    दिवंगत आध्यात्मिक गुरु सत्य साईबाबा यांच्या शताब्दी उत्सवातील भव्य कार्यक्रमात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची उपस्थिती विशेष ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात ऐश्वर्याने दिलेला मानवतेचा संदेश आणि तिच्या आदरयुक्त वर्तनाने उपस्थितांची मनं जिंकली. मंचावर आल्यानंतर ऐश्वर्याने सर्वप्रथम पंतप्रधान मोदींच्या पायांना स्पर्श करून आदर व्यक्त केला. पीएम…

  • तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावर राणाजगजितसिंह पाटील यांचे सुप्रिया सुळे यांना खुले पत्र

    तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावर राणाजगजितसिंह पाटील यांचे सुप्रिया सुळे यांना खुले पत्र

    तुळजापूर येथे सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणासंदर्भात तसेच मुंबईतील शताब्दी रुग्णालयाच्या निविदेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी खुल्या पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. या पत्रात त्यांनी सुळे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक नातेसंबंधांचा उल्लेख करत, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विषयी केल्या जाणाऱ्या विधानांबद्दल नाराजी…

  • अनगर नगराध्यक्षा निवडणूक वादात उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद; बिनविरोध निवडणुकीवरून राजकारण तापलं

    अनगर नगराध्यक्षा निवडणूक वादात उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद; बिनविरोध निवडणुकीवरून राजकारण तापलं

    अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीने तीव्र राजकीय वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज १८ नोव्हेंबर रोजी तहसील प्रशासनाने बाद ठरवला. या निर्णयानंतर थिटे यांनी तो निर्णय न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका घेतली असून, “अर्ज कसा बाद झाला याची चौकशी मागवणार,” असे त्यांनी स्पष्ट…

  • नवी मुंबई विमानतळात 25 डिसेंबरपासून प्रवासी उड्डाणांना सुरुवात; सुरुवातीला फक्त 12 तास सेवा

    नवी मुंबई विमानतळात 25 डिसेंबरपासून प्रवासी उड्डाणांना सुरुवात; सुरुवातीला फक्त 12 तास सेवा

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) प्रवासी सेवेसाठी सज्ज झाला असून, येत्या 25 डिसेंबरपासून नियमित उड्डाणांना प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबरला या प्रकल्पाचे लोकार्पण झाले होते. आता पहिल्या टप्प्यात विमानतळ मर्यादित कालावधीत म्हणजे सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांपर्यंतच कार्यरत राहणार आहे. या कालावधीत…

  • वाघ संवर्धनासाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कोअर क्षेत्रात सफारी बंद, नाईट टुरिझमला पूर्ण बंदी

    वाघ संवर्धनासाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कोअर क्षेत्रात सफारी बंद, नाईट टुरिझमला पूर्ण बंदी

    नवी दिल्ली : वाघ संवर्धनातील वाढत्या उल्लंघनांवर अंकुश ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. देशातील सर्व वाघ राखीव क्षेत्रांसाठी लागू होणाऱ्या या आदेशात कोअर किंवा अत्यावश्यक अधिवास क्षेत्रात कोणत्याही प्रकारची वाघ सफारी परवानगीयोग्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सफारी केवळ नॉन-फॉरेस्ट किंवा डिग्रेडेड जमिनीवर, तसेच बफर क्षेत्रातच होऊ…

  • अनगर नगरपंचायतीत तणाव; एनसीपी उमेदवार उज्वला थिटे यांचा कडेकोट पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल

    अनगर नगरपंचायतीत तणाव; एनसीपी उमेदवार उज्वला थिटे यांचा कडेकोट पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल

    अनगर (सोलापूर) येथील नगरपंचायत निवडणुकीत सोमवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. एनसीपी (अजित पवार गट) यांच्या उमेदवार आणि शेतकरी महिला उज्वला थिटे यांनी जीवाच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधकांकडून वारंवार अडथळे निर्माण होत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे करताच सोलापूर पोलिसांनी एसआरपीएफसह मोठा बंदोबस्त तैनात केला होता.…

  • केंद्र सरकारकडून ‘गोपाल रत्न’ पुरस्कार जाहीर; कोल्हापूरच्या अरविंद पाटील यांचा होणार गौरव

    केंद्र सरकारकडून ‘गोपाल रत्न’ पुरस्कार जाहीर; कोल्हापूरच्या अरविंद पाटील यांचा होणार गौरव

    केंद्र सरकारच्या पशुपालन व दुग्धव्यवसाय मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांची (NGRA) घोषणा यंदासाठी करण्यात आली असून, महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील शेतकरी अरविंद यशवंत पाटील यांनी देशातील सर्वोत्तम दुग्धव्यवसायिक म्हणून मानाचा पुरस्कार पटकावला आहे. स्थानिक जातीच्या गायी-म्हशींचे संगोपन, संवर्धन आणि उत्कृष्ट दुधउत्पादन पद्धतींच्या माध्यमातून त्यांनी आदर्श ठरवला असल्याचे मंत्रालयाने…

  • मुंबई–ठाण्यात CNG पुरवठा संकट कायम; रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल वाढले

    मुंबई–ठाण्यात CNG पुरवठा संकट कायम; रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल वाढले

    मुंबई आणि ठाणे परिसरात गेल तीन दिवसांपासून CNG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून रिक्षा-टॅक्सी वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. वडाळ्यातील गेल (GAIL) कंपनीच्या मुख्य पाइपलाईनमध्ये रविवारी दुपारी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील CNG पुरवठा थांबला. अनेक CNG पंप बंद पडले, तर उघड्या पंपांवर प्रचंड…