Author: mahacentreweb@gmail.com
-

पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर पाकिस्तानचा सायबर वार; 10 लाख हल्ल्यांची नोंद
•
मुंबई : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशाच्या सीमाभागावर तणाव पाहायला मिळत आहे. याचं पार्श्वभूमीवर भारतात सायबर हल्ल्याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एका अहवालानुसार मागील एका आठवड्यात भारतावर 10 लाख पेक्षा जास्त सायबर हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वे, बँकिंग नेटवर्क्स आणि सरकारी पोर्टल्सना…
-

भारतात 10 हजार सिनेमागृहांपैकी सर्वाधिक साऊथमध्ये; आमिर खानने व्यक्त केली चिंता
•
”आपल्या देशात सिनेमागृहे खूपच कमी आहेत. आणि ज्या 10 हजार आहेत त्यापैकी निम्मे दक्षिण भारतात आहेत. त्यामुळे हिंदी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यात अपयशी ठरत असल्याचं”, सिनेअभिनेता आमिर खान यांनी म्हटले आहे. इतकंच नाही तर तो म्हणतो की भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत थिएटर्स खूपच कमी आहेत. त्या तुलनेत अमेरिकेत 40 हजार तर चीनमध्ये…
-

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या या दोन मोठ्या गुडन्यूज
•
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय्य तृतीयाच्या पावन दिवशी दोन मोठ्या गुडन्यूज दिल्या आहेत. फडणवीस दांपत्याची कन्या दिविजा फडणवीस हिने दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली आहे, यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गृहप्रवेश केला आहे.अमृता फडणवीस यांनी ट्वीटरवर पोस्ट शेअर…
-

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात मोठे बदल, माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी निवड
•
सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असून, कुठल्याही क्षणी काहीतरी मोठं घडू शकतं, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्डाची (NSAB) पूनर्स्थापना करण्यात आली आहे.या नव्याने गठीत झालेल्या बोर्डाचं नेतृत्व माजी ‘रॉ’ प्रमुख…
-

कुलदीपची चापट आणि रिंकूचा राग ; सामन्यानंतरचा ‘ड्रामा’ व्हिडीओ व्हायरल”
•
आयपीएल 2025च्या 48व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर 14 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यानंतर एक खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादव आणि कोलकाताचा फलंदाज रिंकू सिंग एकमेकांशी गप्पा मारताना दिसतात.मात्र, गप्पांदरम्यान…
-

प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ,न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली
•
बंगळुरुमधील जनप्रतिनिधींवरील गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने मंगळवारी माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा बलात्कार प्रकरणातील खटला पुढे ढकलण्याचा अर्ज फेटाळून लावला. रेवण्णा यांनी नव्या वकिलाची नेमणूक होईपर्यंत वेळ मागितली होती,मात्र न्यायालयाने ही मागणी चालू खटल्यात उशीर करण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट केलं.न्यायालयीन प्रक्रिया ही केवळ आरोपीच्या हक्कापुरती मर्यादित नसून,…
-

पनवेल : शेकापचे ज्येष्ठ नेते जे.एम म्हात्रे यांचा मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय
•
शेतकरी कामगार पक्षात फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडत ‘एकला चलो’चा निर्णयाची घोषणा शेकापच्या एका नेत्याने केली आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेकापचे पनवेल आणि उरणचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी स्वत: मंगळवारी पनवेल ‘शेकाप’च्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत महाविकास…
-

‘जबाबदारीच्या वेळी गायब’ म्हणत काँग्रेसची पंतप्रधानांवर अप्रत्यक्ष टीका; भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर
•
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्र सरकारला ठाम पाठिंबा दर्शवला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीस अनुपस्थित राहिल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवर एक वादग्रस्त फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये कुणाचंही चेहरा दिसत नाही, मात्र त्यातील पोशाख हा पंतप्रधान मोदी यांच्या विशिष्ट…
-

शिक्षिका सुनिता हत्या प्रकरणात पतीसह सात जण दोषी, करवाचौथनंतर रचला होता खुनाचा कट
•
सुमारे सात वर्षांपूर्वी, २९ ऑक्टोबर २०१८ रोजी, बाह्य दिल्लीतील बवाना येथील रहिवासी सुनिता ही हरियाणातील सोनीपत येथे सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, घर सोडल्यानंतर काहीच मिनिटांत दुचाकीवर आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर गोळीबार केला. तिला तीन गोळ्या लागल्या आणि ती जागीच मृत घोषित करण्यात आली.…
-

मुंबईच्या वांद्रेतील एका मॉलमध्ये भीषण आग, क्रोमा शोरूम जळून खाक
•
मंगळवारी सकाळी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील लिंक स्क्वेअर मॉलमधील क्रोमा शोरूममध्ये भीषण आग लागली. दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी ‘फायर-रोबोट’ घटनास्थळी पाठवला. त्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवता आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आगीची प्रथम नोंद पहाटे ४:११ वाजता झाली, त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने पहाटे…
