बांगलादेश सरकारने २०२५ शैक्षणिक वर्षासाठी शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले असून, यामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना, त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान आणि १९७१ च्या मुक्तियुद्धात भारताने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा वारसा मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये १६ वर्षांनंतर शेख हसीना यांच्या सत्तेचा अंत झाल्यानंतर, नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने राष्ट्रीय इतिहासाच्या सादरीकरणात बदल करण्याचा निर्णय घेतला. या नव्या अभ्यासक्रम बदलांमुळे मुक्तियुद्धातील महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींच्या भूमिका नव्याने मांडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.
बांगलादेशातील आघाडीच्या ‘डेली स्टार’ वृत्तपत्रानुसार, राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक मंडळ ने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या तब्बल ४४१ पाठ्यपुस्तकांमध्ये बदल केले आहेत.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बांगलादेश मुक्तियुद्धातील भारताच्या महत्त्वपूर्ण योगदानाबाबत उल्लेख कमी करण्यात आला आहे. विशेषत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि शेख मुजीबुर रहमान यांचा एकत्र घेतलेला ऐतिहासिक फोटो, जो सहावीच्या इंग्रजी पुस्तकात होता, तो हटवण्यात आला आहे. हा फोटो ६ फेब्रुवारी १९७२ रोजी कोलकात्यातील एका जाहीर सभेतील असून, त्यात दोन्ही नेत्यांनी संयुक्त भाषण दिले होते. याशिवाय, १७ मार्च १९७२ रोजी ढाका येथे इंदिरा गांधींच्या स्वागताचा फोटोही पाठ्यपुस्तकांतून वगळण्यात आला आहे. या बदलांमध्ये सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा उल्लेख सर्व शालेय पाठ्यपुस्तकांतून पूर्णतः काढून टाकण्यात आला आहे.इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, पूर्वी पाठ्यपुस्तकांच्या मुखपृष्ठावर छापला जाणारा शेख हसीना यांचा विद्यार्थ्यांसाठीचा संदेशही काढण्यात आला असून, त्याऐवजी जुलै २०२४ च्या उठावाशी संबंधित भित्तिचित्रांनी त्याची जागा घेतली आहे.

बांग्लादेशच्या इतिहासातून भारताचे नाव पुसून टाकायचा मोहम्मद युनूस यांचा डाव
•
Please follow and like us:
Leave a Reply