महाराष्ट्रातील भाजपची सत्ता औरंगजेबाच्या काळापेक्षाही वाईट;संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या सत्तेचे वर्णन औरंगजेबाच्या राजवटीपेक्षाही भयावह असल्याचे केले. तसेच, राज्यात शेतकरी आत्महत्या करत असल्याचा आणि बेरोजगार व महिलांवर अन्याय वाढल्याचा आरोप केला.
औरंगजेबामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत का? राऊतांचा सवाल

औरंगजेबाला मरणून ४०० वर्षे झाली, हे विसरा. आज महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याला औरंगजेब जबाबदार आहे का? नाही! त्याला भाजप सरकार कारणीभूत आहे; असे राऊत यांनी ठणकावले. जर मुघल शासकाने अन्याय केला असेल, तर सध्याच्या सरकारने काय केले? राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार असून, त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे. तरीही, शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत, असा आरोप त्यांनी केला.

भाजपचा कारभार औरंगजेबापेक्षाही भयंकर

संजय राऊत यांनी शेतकरी आत्महत्यांवरून सरकारला धारेवर धरले. भाजपचा कारभार औरंगजेबापेक्षाही वाईट आहे; असे ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या थडग्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या वक्तव्यावर बोलताना; ही जागा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) संरक्षणाखाली आहे. त्यामुळे कायदेशीर चौकटीतच कोणतेही निर्णय घेतले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

संभाजी राजांना छळून मारले गेले, हा इतिहास विसरता येणार नाही
भाजपचे सातारा लोकसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाचे थडगे हटवण्याची मागणी केली होती. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, महाराष्ट्रात संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण कायम आहे. औरंगजेबाच्या आदेशानुसार त्यांना पकडले गेले, छळले गेले आणि क्रूरपणे ठार मारण्यात आले. हा इतिहास कोणीही पुसून टाकू शकत नाही.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *