Category: News and Updates
-

पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश; सोहम सुर्वे IIT JAM मध्ये देशात तिसरा
•
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सोहम राजेश सुर्वे याने IIT JAM (जॉईंट ऍडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स) एमएस २०२६ या स्पर्धात्मक परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स या विषयात मिळवलेले हे यश केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. IIT JAM ही देशातील…
-

कै. बळीराम यशवंत (दाजी) म्हात्रे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत आरोग्य शिबिर उत्साहात
•
वाडा : कै. बळीराम यशवंत (दाजी) म्हात्रे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी व होमिओपॅथिक औषधोपचार शिबिर उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. जनसेवा मंडळ ट्रस्टच्या साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि नित्यानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश मैदान, वाडा येथे शुक्रवारी (दि. २० फेब्रुवारी) हे शिबिर आयोजित करण्यात…
-

जमीन रूपांतर प्रक्रियेला वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने एन.ए. परवानगीची सक्ती रद्द
•
राज्यातील जमीन मालकांसाठी दिलासादायक ठरणारा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमीन महसूल कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करत बिगर कृषी (एन.ए.) परवानगीची सक्ती रद्द केली आहे. त्यामुळे आता जमिनीचा अकृषक वापर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र एन.ए. मंजुरी घेण्याची गरज राहणार नाही. नवीन निर्णयानुसार…
-

राष्ट्रीय खो-खो पटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती
•
राष्ट्रीय खो-खो पटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाचे प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. लाड हे डॉ. शिरोडकर हायस्कूल व महर्षी दयानंद कॉलेजचे विद्यार्थी असून, युवक क्रीडा मंडळ, परळ या संघातर्फे त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये…
-

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन; देशाने गमावला पर्यावरण रक्षणाचा मार्गदर्शक
•
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, पारिस्थितिकीविद् आणि विचारवंत डॉ. माधव गाडगीळ यांचे मंगळवारी रात्री पुण्यात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. अल्प आजाराने त्रस्त असलेल्या गाडगीळ यांनी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशाने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातील एक अत्यंत प्रभावी आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावले आहे. डॉ. माधव गाडगीळ यांनी अनेक…
-

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता आरोपी
•
अकोला | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या झाल्याने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी (6 जानेवारी) अकोट तालुक्यातील मोहाळा गावात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज…
-

‘शोध मराठी मनाचा’चा २१ वा जागतिक मराठी संमेलन सोहळा यंदा गोव्यात
•
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव करणारे ‘शोध मराठी मनाचा’ हे २१ वे जागतिक मराठी संमेलन येत्या ९ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत चंदा गोळ्याच्या पवित्र भूमीत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या भव्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रख्यात अणुभौतिक शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकडकर भूषवणार असून, संमेलनाचे उद्घाटन ९…
-

यशवंतराव ते पृथ्वीराज
•
सातारा जिल्ह्यातील दोन चव्हाण, दोन्ही नेते वेगवेगळ्या कालखंडात कार्यरत राहिले… पण त्यांच्यातील “साम्य” आता नव्याने समोर येत आहे… संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर, यशवंतराव कॉँग्रेसचे पहिले मुख्यमंत्री बनले होते. तर २०१४ पर्यंत किल्ला लढविणारे पृथ्वीराज हे कॉँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री, त्यानंतर सलग तीन वेळा देवेंद्र फडणवीस आणि एकेकदा उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे…
-

माणिकराव कोकाटे अडचणीत; राजीनाम्याची शक्यता, धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची चर्चा
•
सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मंगळवारी न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या निकालानंतर याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकाटे यांना…
-

स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; काँग्रेसमध्ये खळबळ
•
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार प्रज्ञा सातव यांचा उद्या 18 डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजीमुळे त्यांनी हा…
