Category: News and Updates
-

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आज होणार घोषणा
•
महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अखेर घोषणा होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज (मंगळवार) दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणुका रखडल्या होत्या. प्रभाग रचना…
-

निवडणुकांचे अंदाजे वेळापत्रक सांगून दिलीप वळसे पाटील चर्चेत; राजकीय वर्तुळात खळबळ
•
राज्यात मतचोरीविरोधातील ऐल्गार सभा रंगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करून राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडवली आहे. आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना वळसे पाटील म्हणाले, “मी तारीख जाहीर करत नाही, तो अधिकार…
-

एकनाथ खडसेंच्या घरातील चोरी प्रकरणातील दोन आरोपी ताब्यात; त्या सीडीचं काय झालं?
•
जळगाव – माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील घरातील चोरी प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, चोरी गेलेले काही मौल्यवान दागिने व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, खडसे यांनी सुरुवातीला उल्लेख केलेल्या सीडी व पेन ड्राईव्हबाबत अद्याप काहीही धागादोरा लागलेला…
-

पाकिस्तानच्या अणवस्त्र चाचण्यांमुळे भूकंप येतात, अमेरिका देखील चाचणी करणार : डोनाल्ड ट्रम्प
•
अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक राजकारणात खळबळ उडवणारे विधान केले आहे. पाकिस्तानकडून भूमिगत अणवस्त्र चाचण्या केल्या जात असून त्यामुळे भूकंपांचे प्रमाण वाढत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ते रविवारी सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ट्रम्प म्हणाले, “रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान हे देश सातत्याने…
-

कोस्टल रोडवर अंधारामुळे प्रवाशांना त्रास; अपघाताचा धोका वाढला!
•
मुंबई : कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला झाल्यानंतर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, अनियंत्रित वेगमर्यादा आणि रस्त्यावरच्या दिव्यांचा अंधार यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे. रात्रीच्या वेळी अनेक वाहनचालकांना अंधारात प्रवास करावा लागत असून, यामुळे गंभीर दुर्घटनांचा संभव निर्माण झाला आहे. वाहनचालकांनी सोशल मीडियावरून या समस्येबाबत तक्रारी नोंदवल्या…
-

असीम सरोदेंची वकिली सनद रद्द; न्यायव्यवस्थेवरील वक्तव्यांवर बार कौन्सिलची कारवाई
•
पुणे : प्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा मोठा निर्णय घेतला. अॅडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा अहवाल सादर केला असून, सरोदे यांनी न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ही कारवाई करण्यात…
-

मतचोरीविरोधात ‘सत्याचा मोर्चा’; राज-उद्धव-पवार एकत्र मुंबईत आंदोलनात
•
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महाविकास आघाडी (मविआ) यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली आज मुंबईत “सत्याचा मोर्चा” काढण्यात आला. मतदार याद्यांमधील घोळ, दुबार मतदार, बनावट नोंदी आणि संभाव्य मतचोरीच्या आरोपांवरून या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. या मोर्च्यात शरद पवार , उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे यांसह विरोधी पक्षांचे अनेक…
-

परतीच्या पावसाने तळकोकणात संकटाचा ‘पूर’, शेती, पर्यटन आणि मत्स्यव्यवसाय धोक्यात
•
तळकोकणात परतीच्या पावसाचा जोर अद्याप कायम असून, त्यामुळे शेतकरी, फळबागायतदार आणि मच्छीमार या तिघांच्याही जगण्यावर मोठा परिणाम झाला आहे. सिंधुदुर्गात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कापलेले पीक शेतातच कुजले, तर उभी शेतीही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. या नैसर्गिक संकटामुळे आधीच उत्पादनखर्चाच्या…
-

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय : पोलिस अधीक्षकांच्या मंजुरीविना वकिलांना समन्स पाठवता येणार नाही
•
नवी दिल्ली – पोलिस अधीक्षकांची (एसपी) मंजुरी घेतल्याशिवाय तपास अधिकारी कोणत्याही वकिलांना चौकशीसाठी समन्स पाठवू शकणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. वकिलांच्या हक्कांचे आणि पक्षकारांच्या न्यायसुरक्षेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) एका अधिकाऱ्याने चौकशीदरम्यान एका वकिलाला समन्स पाठवला होता.…
-

राज्यात लवकरच नगरपालिका निवडणुकीचा शंखनाद; घोषणा पुढील आठवड्यात अपेक्षित
•
मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत तयारी पूर्ण केली असून येत्या काही दिवसांत औपचारिक घोषणा करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. राज्यातील २४८ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य…
