Category: News and Updates
-
अमेरिका : पेंटॅगॉनमध्ये पत्रकारांवर नवे निर्बंध; फक्त सरकारने परवानगी दिलेलीच माहिती प्रसिद्ध करता येणार
•
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने पेंटॅगॉनमध्ये कार्यरत पत्रकारांवर कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या धोरणानुसार, पत्रकारांना आता फक्त सरकारने परवानगी दिलेली माहितीच प्रसिद्ध करता येणार असून, अगदी गोपनीय नसलेली माहिती देखील अधिकृत मंजुरीशिवाय जाहीर करता येणार नाही. या धोरणामुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.…
-
एच-१बी व्हिसावर ट्रम्प सरकारने लावली ८८ लाख वार्षिक फी
•
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसावर वार्षिक $१००,००० (सुमारे ₹88 लाख) शुल्क लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा धक्का बसणार असून, विशेषतः भारतीय आणि चिनी कामगारांवर गंभीर परिणाम होणार आहे. सध्या अमेरिकेतील टेक कंपन्या, बँका आणि कन्सल्टिंग क्षेत्र हे भारत व चीनमधील उच्च…
-
फडणवीसांचा गोपीचंद पडळकरांना सज्जड सल्ला; जयंत पाटलांवरील वक्तव्यावरून कान टोचले
•
सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघातील सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या गलिच्छ शब्दातील टीकेनंतर राज्याच्या राजकारणात चांगलाच गोंधळ उडाला आहे. पडळकर यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली असून, शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून नाराजी व्यक्त केली. यावर…
-
एका आठवड्यात खड्डे बुजवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश; दोषी कंत्राटदारांवर कारवाईचे निर्देश
•
मुंबई : राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वर्षभरात तब्बल १२९ नागरिकांना प्राण गमवावे लागले असून ९९ जण जखमी झाले आहेत. या गंभीर परिस्थितीवर संताप व्यक्त करत उच्च न्यायालयाने सर्व महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांना एका आठवड्यात खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर, दोषी कंत्राटदार आणि हलगर्जीपणा करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे…
-
ओला-उबरच्या प्रवाशांना दिलासा; प्रति किमी भाडे २२.७२ रुपये निश्चित
•
मुंबई : महानगरातील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ॲपआधारित कॅब सेवांचे भाडे परिवहन विभागाने अखेर निश्चित केले असून, आता ओला-उबरसारख्या टॅक्सींचे बेसिक भाडे प्रति किलोमीटर २२.७२ रुपये असेल. प्रवाशांच्या तक्रारी, चालकांच्या मागण्या आणि ॲप कंपन्यांच्या धोरणांवर अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. अखेर ऑक्टोबर १८ पासून हे नवीन नियम लागू…
-
पालिकांच्या निवडणुकांत युतीचा निर्णय स्थानिक स्तरावर : हर्षवर्धन सकपाळ
•
ठाणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडीचा धर्म पाळताना झालेल्या तडजोडींमुळे काँग्रेसला अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नाही. त्यामुळे आता आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत युती व आघाडीचा निर्णय स्थानिक स्तरावर घेण्याचे स्वातंत्र्य पक्षाने जिल्हा व तालुकास्तरावरील संघटनांना दिल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिली. कोकण विभागातील महापालिका क्षेत्रातील…
-
मराठा आरक्षणाला दिलासा: हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली
•
मराठा समाजासाठी महत्त्वाची ठरणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात दाखल झालेली पहिली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. अॅड. विनीत धोत्रे यांनी 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला आव्हान देत ही याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याचं स्पष्ट…
-
मनोज जरांगेंच्या तोंडून पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक
•
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात गेल्या दोन वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता पहिल्यांदाच त्यांचं उघडपणे कौतुक केलं आहे. धाराशिवमधील एका कार्यक्रमात जरांगे यांनी फडणवीसांना थेट ‘काकाजी’ म्हणून संबोधलं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंतरवाली सराटी येथे पोलिस लाठीमार झाला होता. त्यावेळी गृहमंत्रिपद फडणवीसांकडे असल्याने त्यांच्यावर जबाबदारी…
-
भारतामध्ये नेपाळसारखी परिस्थिती उद्भवू शकते; प्रकाश आंबेडकर
•
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारतातील सध्याच्या परिस्थितीवर गंभीर इशारा दिला आहे. नेपाळमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून तरुणांनी सत्ता उलथवून टाकली, तसाच उद्रेक भारतातही होऊ शकतो, असे ते म्हणाले. पुण्यात माध्यमांशी बोलताना आंबेडकरांनी पीएचडी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला समर्थन दर्शवले. विद्यार्थी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत असूनही पोलिसांनी त्यांची दखल…
-
मनोज जरांगे पाटलांचा ‘चलो दिल्ली’ नारा; मराठा समाजाचे लवकरच दिल्लीत अधिवेशन
•
धाराशिव : मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता ‘चलो दिल्ली’चा नारा दिला आहे. धाराशिवमध्ये हैद्राबाद गॅझेट संदर्भातील बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. देशभरातील मराठा बांधवांना एकत्र आणण्यासाठी दिल्लीत मोठं अधिवेशन घेण्यात येणार असून लवकरच त्याची तारीख जाहीर होणार आहे. जरांगे पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी…