Category: News and Updates
-

सिंगापूरहून आलेल्या मावशीच्या फोनमुळे मुलीची सुटका; वडिलांना २० वर्षांची शिक्षा
•
पाच वर्षांच्या मुलीवरील वडिलांच्या लैंगिक अत्याचाराचे भीषण प्रकरण एका सिंगापूरहून आलेल्या मावशीच्या जागरूकतेमुळे उजेडात आले आहे. सात वर्षांच्या संघर्षानंतर, चेन्नईतील एका बिल्डर वडिलांना पोक्सो न्यायालयाने २० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही दुर्दैवी घटना एप्रिल २०१८ मध्ये घडली. आंघोळ घालण्याच्या बहाण्याने वडिलांनी मुलीवर अत्याचार केला. घडलेल्या प्रकाराबाबत मुलीने आईकडे…
-

भारतीय नौदल लढाईसाठी सज्ज; अरबी समुद्रातून डागली जहाजविरोधी क्षेपणास्त्रे
•
भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी अरबी समुद्रात हालचालींना गती देत नुकतेच अनेक जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ही माहिती दिली.या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, “भारतीय नौदलाच्या जहाजांनी लांब पल्ल्याच्या अचूक आक्रमणासाठी प्लॅटफॉर्म, प्रणाली आणि दलाची तयारी सिद्ध करण्यासाठी आणि क्षमता दाखवण्यासाठी जहाजविरोधी…
-

दिग्दर्शकावर ड्रग्स बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल; तर या अभिनेत्याला पोलिसांची नोटीस
•
मल्याळम चित्रपट दिग्दर्शक खालिद रहमान आणि अशरफ हमजा यांना हायब्रिड गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने कोचीतील एका फ्लॅटवर छापा टाकून त्यांना आणि त्यांचा मित्र शलीफ मोहम्मद याला अटक केली. या छाप्यात १.६ ग्रॅम हायब्रिड गांजा जप्त करण्यात आला. नंतर तिघांनाही जामिनावर सुटका करण्यात आली. घटना अशी…
-

NCERT : ७ वीच्या इतिहासच्या पुस्तकात मोठे बदल; मुघल आणि दिल्ली सल्तनतचे संदर्भ वगळले
•
एनसीईआरटीने इयत्ता ७ वीच्या इतिहासाच्या नवीन पुस्तकात मोठे बदल केले असून, मुघल आणि दिल्ली सल्तनतचे संदर्भ काढून टाकले आहेत. याऐवजी, भारतीय राजवंशांचे, पवित्र भूगोलाचे, महाकुंभाचे संदर्भ आणि मेक इन इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या सरकारी योजनांचा समावेश करण्यात आले आहे. या आठवड्यात प्रकाशित झालेल्या नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण…
-

हेडफोन लावून गाडी चालवता, सावधान! चालकावर होणार ही कारवाई
•
वाहन चालवताना हेडफोन घालून मोबाईलवर गाणी ऐकणं, चित्रपट पाहणं, क्रिकेटचे सामने वा सोशल मीडियावर रिल्स पाहणं अशा धोकादायक सवयींमुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. याला लगाम घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली येत्या सोमवारी (२८ एप्रिल) महत्त्वाची बैठक होणार आहे.या बैठकीत वाहन चालवताना हेडफोन वापरणाऱ्या चालकांवर थेट कारवाई करण्याचा…
-

नूतन मराठा कॉलेजमधील धक्कादायक घटना; कॉलेजच्या प्रांगणात तरुणाची आत्महत्या
•
शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या पार्किंग परिसरात एका महाविद्यालयीन तरुणाने प्रेमभंगाच्या नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. २७ एप्रिल) सकाळी उघडकीस आली.मृत तरुणाचे नाव सतीश बाविस्कर (वय १९) असे असून, तो महाविद्यालयाजवळील वसतिगृहात वास्तव्यास होता. सतीश हा अनाथ असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. सकाळच्या सुमारास सतीशने महाविद्यालयाच्या…
-

मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला तुरुंग आणि पोलिस नियमावली ऑनलाईन प्रकाशित करण्याचे आदेश
•
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला आपल्या अधिकृत वेबसाइटवर तुरुंग आणि पोलिस नियमावली ऑनलाइन प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा महत्त्वाच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने टिप्पणी केली की तुरुंग नियमावलीत कोणतीही गोपनीय…
-

वाकोला येथे दोन समुदायांमध्ये हाणामारी; सात जणांना अटक
•
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी संध्याकाळी सांताक्रूझ (पूर्व) येथील वाकोला परिसरात दोन समुदायांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर वाकोला पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. अटकेतील आरोपींवर बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगल घडविणे आणि दुखापत केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी…
-

वाढवण बंदरासाठी ५,७०० कोटींचा करार ; पायाभूत सुविधांच्या कामांना गती
•
महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराच्या विकासासाठी मोठा टप्पा गाठण्यात आला असून, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत तब्बल ₹५,७०० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री, ‘एमओएसपीडब्ल्यू’ शंतनू ठाकूर, ‘जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण’ (जेएनपीए)चे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ आणि ‘एमओपीएसडब्ल्यू’चे इतर…
-

“पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ‘नागरी शौर्य’ पुरस्कार द्या”; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
•
जम्मू-काश्मीरमधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅली, पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अमानुष हल्ल्यात देशातील १५ राज्यांतील पर्यटकांचा बळी गेला असून, महाराष्ट्रालाही मोठी हानी सोसावी लागली आहे. या घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
