Category: News and Updates

  • कुपोषणाऐवजी स्थूलपणाचं संकट; २०३० पर्यंत जगातील ११% भार भारतावर?

    कुपोषणाऐवजी स्थूलपणाचं संकट; २०३० पर्यंत जगातील ११% भार भारतावर?

    युनिसेफच्या चाइल्ड न्यूट्रिशन रिपोर्ट २०२५ नुसार भारतात मुलांमधील कुपोषणाचं चित्र बदलत असून स्थूलपणा हे मोठं संकट म्हणून समोर आलं आहे. यापूर्वी मुलांमध्ये वजन कमी असणं हे कुपोषणाचं प्रमुख लक्षण मानलं जात होतं; पण आता अति खाणं, चुकीचं खाणं आणि निष्क्रिय जीवनशैलीमुळे स्थूलपणा वेगाने वाढताना दिसतो आहे. अहवालानुसार, २०३० पर्यंत भारत…

  • जमाते इस्लामीचा विजय : जेयु विद्यार्थी निवडणुकांत इस्लामी छात्र शिबिरचे वर्चस्व”

    जमाते इस्लामीचा विजय : जेयु विद्यार्थी निवडणुकांत इस्लामी छात्र शिबिरचे वर्चस्व”

    ढाका विद्यापीठातील (डीयू) विजयाच्या काही दिवसांनंतर इस्लामी संघटना जामाते-इस्लामीने जाहंगिरनगर विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकांवर झेंडा फडकावला आहे. इस्लामी छात्र शिबिर , जी जामाते-इस्लामीची विद्यार्थी शाखा आहे, हिने शनिवारी झालेल्या केंद्रीय विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांत २५ पैकी तब्बल २० जागांवर विजय मिळवला. विशेष म्हणजे मागील ३५ वर्षांपासून या संघटनेवर कॅम्पस बंदी होती. अलीकडेच…

  • महाराष्ट्रात मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासाला गती; मुख्यमंत्र्यांचा संकल्प

    महाराष्ट्रात मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासाला गती; मुख्यमंत्र्यांचा संकल्प

    महाराष्ट्रात मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्रात प्रचंड विकासाची क्षमता असून त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य सरकार सर्वंकष योजना आखणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वर्षा निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील मत्स्यव्यवसायाच्या प्रगतीसाठी अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मत्स्यव्यवसाय…

  • नक्षलवादाच्या छायेतून शिक्षणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल, ७२ वाचनालये उभारले

    नक्षलवादाच्या छायेतून शिक्षणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल, ७२ वाचनालये उभारले

    गडचिरोली जिल्हा एकेकाळी नक्षलवादामुळे ओळखला जात होता. पोलिसांचे अस्तित्वच नसलेल्या या भागात आज शिक्षणाची क्रांती होत आहे. पोलिस प्रशासनाने गावकऱ्यांच्या मदतीने जिल्ह्यात तब्बल ७२ वाचनालये उभारून नवा इतिहास रचला आहे. या वाचनालयांमुळे जिल्ह्यातील तरुणाईला अभ्यासासाठी सुरक्षित व सकारात्मक वातावरण मिळाले आहे. स्पर्धा परीक्षा, नैतिक मूल्ये व संस्कार यांसंबंधी हजारो पुस्तके…

  • “राज”शाही स्पर्श लाभलेला  शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा खुला होणार !

    “राज”शाही स्पर्श लाभलेला शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा खुला होणार !

    मुंबई : दीड वर्षांच्या ब्रेकनंतर शिवाजी पार्क जिमखाना अखेर पुन्हा एकदा सदस्यांसाठी नव्या रूपात खुला होत आहे. येत्या २२ सप्टेंबरपासून, म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी, जिमखाना सदस्यांसाठी “भारतरत्न” सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते खुला होणार आहे. मधल्या काळात जिमखान्याच्या पुनर्निर्माण आणि आधुनिकीकरणासाठी तो बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी…

  • तेजस घाडगे यांना राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्कार

    तेजस घाडगे यांना राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्कार

    वडोदरा येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय चेंजमेकर परिषदेत प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या पालवी प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय भागीदारी व स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्स प्रमुख तेजस डिंपल घाडगे यांना राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. देशभरातील २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून निवडलेल्या ५१ समाजपरिवर्तकांपैकी घाडगे हे एकमेव पुरस्कार विजेते ठरले. हा सोहळा समन्वय प्रतिष्ठान, वडोदरा…

  • मुंबईसह राज्यात पावसाचा कहर; अनेक जिल्ह्यांना अलर्ट

    मुंबईसह राज्यात पावसाचा कहर; अनेक जिल्ह्यांना अलर्ट

    रविवारी रात्रीपासून मुंबईसह कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे. त्यामुळे नद्या-नाले भरून वाहू लागले असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत. हवामान खात्याने सोमवारी (15 सप्टेंबर) राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे, बीड, सोलापूर आणि अहिल्यानगर येथे 40 ते 50…

  • स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्काराने संपादक मनोज भोयर यांचा होणार सन्मान

    स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्काराने संपादक मनोज भोयर यांचा होणार सन्मान

    नागपूर : विदर्भातील पत्रकारिता क्षेत्राला प्रेरणा देणारे ज्येष्ठ कवी, विचारवंत आणि पत्रकार स्व. अनिलकुमार यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी दिला जाणारा “स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार” यंदासाठी जाहीर करण्यात आला आहे.  नवराष्ट्र डिजिटलचे राजकीय संपादक मनोज भोयर यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. त्यांच्यासह दैनिक हितवादाचे सहसंपादक राहुल दीक्षित, ज्येष्ठ छायाचित्रकार…

  • तेजस्वी यादव यांच्या ‘बिहार अधिकार’ यात्रेला १६ सप्टेंबरपासून सुरुवात

    तेजस्वी यादव यांच्या ‘बिहार अधिकार’ यात्रेला १६ सप्टेंबरपासून सुरुवात

    बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असताना विरोधी महाआघाडीने प्रचाराला गती दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या १४ दिवसांच्या ‘मतदार अधिकार यात्रा’नंतर आता आरजेडीचे नेते व विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव १६ सप्टेंबरपासून ‘बिहार अधिकार यात्रा’स सुरुवात करणार आहेत. ही पाच दिवसांची यात्रा १६ ते २० सप्टेंबरदरम्यान पार पडणार असून तिचा…

  • देशातील २१% खासदार-आमदार राजकीय घराण्यातून : महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

    देशातील २१% खासदार-आमदार राजकीय घराण्यातून : महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

    नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालानुसार देशातील लोकप्रतिनिधींमध्ये घराणेशाहीचा प्रभाव प्रचंड आहे. देशातील २१% खासदार, आमदार आणि विधानपरिषदेचे सदस्य हे राजकीय कुटुंबातून आलेले आहेत. यात उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, उत्तर प्रदेशातील ६०४ लोकप्रतिनिधींमध्ये १४१ (२३%) जण राजकीय घराण्यातील आहेत. महाराष्ट्रात ४०३…