Category: News and Updates
-

वाकेश्वर बाणगंगेच्या महाआरतीला जी.एस.बी. टेम्पल ट्रस्ट तर्फे तब्बल ₹२४९ कोटींचा विमा
•
मुंबई | दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त वाकेश्वर येथील प्रसिद्ध ‘बाणगंगेची महाआरती’ मोठ्या उत्साहात पार पडते. यंदाही बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत या महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. भाविकांची वर्षागणिक वाढणारी गर्दी लक्षात घेता, जी. एस. बी. टेम्पल ट्रस्टने या कार्यक्रमासाठी विशेष तयारी केली आहे. भाविकांच्या…
-

246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल
•
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. त्यासोबतच आज, 4 नोव्हेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगरपंचायती, 336 पंचायत…
-

तामिळनाडू भाजपात अंतर्गत कलह वाढला; अन्नामलाईंच्या वक्तव्यामुळे नवा चर्चेचा भडका
•
तामिळनाडू : तामिळनाडू भाजपात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कलहाला आता अधिक हवा मिळाली आहे. एप्रिल महिन्यात पक्षाने के. अन्नामलाई यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी नैनार नागेंद्रन यांची नियुक्ती केली होती. या निर्णयानंतर भाजपातील नाराजी आणि गटबाजी वाढल्याचं चित्र आहे. अन्नामलाई हे तामिळनाडूमधील भाजपाचे तरुण आणि लोकप्रिय नेते मानले…
-

रोहित आर्य प्रकरणात केसरकरांची चौकशी होणार
•
मुंबई : पवईतील आर.ए. स्टुडिओमध्ये घडलेल्या रोहित आर्य ओलीसनाट्य प्रकरणात पोलिस तपासाचा फास अधिक घट्ट होत चालला आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील सर्व धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली असून, आता आमदार दीपक केसरकर यांचीदेखील चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घटनेदरम्यान रोहित आर्यने माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलायची…
-

लाचखोरीवर भाषण आणि तासाभरात लाच घेताना पकडला गेला एसीबीचा अधिकारी
•
जयपूर : भ्रष्टाचाराविरोधी मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यानेच भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या सवाई माधोपुर येथे भ्रष्टाचार निरोधक विभागाचे (ACB) अॅडिशनल एसपी भैरूलाल मीणा यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. विशेष म्हणजे, ही घटना त्यांच्या “लाचखोरी कशी चुकीची आहे” या विषयावर दिलेल्या भाषणानंतर केवळ एका तासात घडली.…
-

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आज होणार घोषणा
•
महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अखेर घोषणा होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज (मंगळवार) दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणुका रखडल्या होत्या. प्रभाग रचना…
-

निवडणुकांचे अंदाजे वेळापत्रक सांगून दिलीप वळसे पाटील चर्चेत; राजकीय वर्तुळात खळबळ
•
राज्यात मतचोरीविरोधातील ऐल्गार सभा रंगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करून राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडवली आहे. आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना वळसे पाटील म्हणाले, “मी तारीख जाहीर करत नाही, तो अधिकार…
-

एकनाथ खडसेंच्या घरातील चोरी प्रकरणातील दोन आरोपी ताब्यात; त्या सीडीचं काय झालं?
•
जळगाव – माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील घरातील चोरी प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, चोरी गेलेले काही मौल्यवान दागिने व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र, खडसे यांनी सुरुवातीला उल्लेख केलेल्या सीडी व पेन ड्राईव्हबाबत अद्याप काहीही धागादोरा लागलेला…
-

पाकिस्तानच्या अणवस्त्र चाचण्यांमुळे भूकंप येतात, अमेरिका देखील चाचणी करणार : डोनाल्ड ट्रम्प
•
अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक राजकारणात खळबळ उडवणारे विधान केले आहे. पाकिस्तानकडून भूमिगत अणवस्त्र चाचण्या केल्या जात असून त्यामुळे भूकंपांचे प्रमाण वाढत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ते रविवारी सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ट्रम्प म्हणाले, “रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान हे देश सातत्याने…
-

कोस्टल रोडवर अंधारामुळे प्रवाशांना त्रास; अपघाताचा धोका वाढला!
•
मुंबई : कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला झाल्यानंतर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, अनियंत्रित वेगमर्यादा आणि रस्त्यावरच्या दिव्यांचा अंधार यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे. रात्रीच्या वेळी अनेक वाहनचालकांना अंधारात प्रवास करावा लागत असून, यामुळे गंभीर दुर्घटनांचा संभव निर्माण झाला आहे. वाहनचालकांनी सोशल मीडियावरून या समस्येबाबत तक्रारी नोंदवल्या…
