Category: News and Updates
-
नोबेल पुरस्कारावरून खळबळ! नेतान्याहू यांनी शेअर केला डोनाल्ड ट्रम्पचा एआय जनरेटेड फोटो
•
इस्त्रायल–हमास युद्धातील युद्धबंदी करारानंतर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळावा अशी उघड मागणी केली असून, त्यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर एक एआय जनरेटेड फोटो शेअर केला आहे. या फोटोत ट्रम्प यांनी गळ्यात नोबेल शांती पुरस्काराचे पदक…
-
देवेंद्र भुजबळ यांना ‘माध्यमभूषण’ पुरस्कार जाहीर
•
पनवेल – कोकणातील दि. म्हसळा टाइम्स या वृत्तपत्राच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक श्री. देवेंद्र भुजबळ यांना यावर्षीचा “गौरव महाराष्ट्राचा: राज्यस्तरीय माध्यमभूषण पुरस्कार” जाहीर झाला आहे. हा पुरस्कार समारंभ रुक्मिणी पांडुरंग पोटले चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई आणि आदर्श शैक्षणिक समूह संचलित डी.…
-
आरे ते कफ परेड मेट्रोला विक्रमी प्रतिसाद; पहिल्याच दिवशी एक लाख प्रवासी
•
मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील आणखी एक ऐतिहासिक पाऊल म्हणून आरे ते कफ परेड मेट्रो-३ सेवा मंगळवारी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या भूमिगत मेट्रोला पहिल्याच दिवशी तब्बल एक लाख आठ हजारांहून अधिक प्रवाशांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला. पुढील दिवशी ही संख्या वाढून १…
-
जोगेश्वरीत भीषण घटना; सिमेंटच्या वीटेमुळे २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू, बांधकाम कंपनीवर गुन्हा दाखल
•
मुंबई : ९ ऑक्टोबर जोगेश्वरी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत २२ वर्षीय संस्कृती अनिल अमीन हिचा सिमेंटच्या वीटेमुळे मृत्यू झाला आहे. ही वीट श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या बांधकामाधीन इमारतीवरून खाली पडली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली, जेव्हा संस्कृती कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. काही अंतरावर गेल्यानंतर अचानक…
-
आश्रमशाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गळफास लावून आयुष्य संपवलं
•
पालघर : वाडा तालुक्यातील आंबिस्ते खुर्द येथील अनुसूचित माध्यमिक आश्रमशाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह शाळेच्या परिसरातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. याप्रकरणी…
-
नांदेड गुरुद्वारा बोर्ड बरखास्तीचा शासननिर्णय रद्द; २०२२ मधील बोर्डची पुनर्स्थापना करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश
•
नांदेड : नांदेड येथील सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्ड बरखास्त करण्याचा राज्य शासनाचा जून २०२२ मधील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण निकालानुसार, तत्कालीन गुरुद्वारा बोर्डाची तशीच पुनर्स्थापना करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्य शासनाने १९५६ मध्ये नांदेड गुरुद्वारा कायदा पारित करून…
-
सोन्याने पुन्हा विक्रमी झेप घेतली; ११ महिन्यांत तब्बल ५० हजार रुपयांची वाढ
•
जागतिक बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आणि अमेरिकन सरकारच्या शटडाऊनमुळे सोन्या-चांदीच्या किमतींनी नव्याने विक्रमी उच्चांक गाठला आहे. बुधवारी जळगावच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर तोळ्यामागे तब्बल ₹१,२७,००० वर पोहोचला, तर चांदी ₹१,६०,००० रुपये किलो दराने स्थिरावली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोन्याचा दर ₹७७,००० रुपये होता. म्हणजेच, अवघ्या ११ महिन्यांत सोन्याने ₹५०,०००…
-
आरे-कफ परेड मेट्रो आजपासून प्रवाशांसाठी सुरू; सकाळी ५.५५ वाजता सुटली पहिली गाडी
•
मुंबई : मुंबईकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. आरे-कफ परेड या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवर आजपासून प्रवासी वाहतूक अधिकृतपणे सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी या मार्गिकेचे लोकार्पण झाले होते, आणि गुरुवारपासून (९ ऑक्टोबर) सकाळी ५.५५ वाजता पहिली मेट्रोगाडी प्रवासाला निघाली. एकूण ३३.५ किलोमीटर लांबीचा हा भुयारी…
-
महाराष्ट्रात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधांच्या विक्रीवर बंदी
•
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे अनेक बालकांचे मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर एफडीएने राज्यातील औषध विक्रेत्यांना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधे विकू नयेत, असा कठोर आदेश जारी केला आहे. एफडीएचे राज्य औषध नियंत्रण अधिकारी डॉ. श्रीनिवास शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कफ…
-
पुण्यात एटीएसची मोठी कारवाई; १९ संशयितांच्या घरांवर आणि कार्यालयांवर झडती
•
पुणे : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी उशिरा रात्री पुण्यातील कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी कारवाई केली. दहशतवादी विचारसरणीशी संबंधित काही व्यक्तींच्या हालचालींबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोहीम हाती घेण्यात आली. ही कारवाई संपूर्ण रात्री सुरू राहिली आणि गुरुवारी पहाटेपर्यंत चालली. मिळालेल्या माहितीनुसार, या मोहिमेत एटीएस आणि पुणे पोलिसांच्या…