Category: News and Updates

  • डाचकुल पाडा परिसरात तणाव; मुलीच्या छेडछाडीनंतर दोन गटांमध्ये झटापट, 25 रिक्षांची तोडफोड

    डाचकुल पाडा परिसरात तणाव; मुलीच्या छेडछाडीनंतर दोन गटांमध्ये झटापट, 25 रिक्षांची तोडफोड

    काशीमिरा │ काशीमिरा परिसरातील डाचकुल पाडा येथे मुलीच्या छेडछाडीच्या प्रकारानंतर दोन गटांमध्ये झालेल्या झटापटीने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सोमवारी रात्री झालेल्या किरकोळ वादानंतर मंगळवारी सकाळी काही अज्ञात व्यक्तींनी हातात दांडके, लोखंडी सळ्या आणि दगड घेऊन परिसरात दहशत माजवली. त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या २५ पेक्षा जास्त रिक्षांच्या काचा फोडून…

  • पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा! पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

    पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा! पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

    देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने महाराष्ट्रात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचे इशारे हवामान खात्याने दिले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 21 ऑक्टोबरपासून 25 ऑक्टोबरपर्यंत कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना…

  • देशात वाढणार वैद्यकीय शिक्षणाच्या संधी; १०,६५० नव्या एमबीबीएस जागांना मंजुरी

    देशात वाढणार वैद्यकीय शिक्षणाच्या संधी; १०,६५० नव्या एमबीबीएस जागांना मंजुरी

    नवी दिल्ली : देशात वैद्यकीय शिक्षणाच्या संधींमध्ये मोठी वाढ होणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी तब्बल १०,६५० नवीन एमबीबीएस जागांना मंजुरी दिली आहे. यासोबतच ४६ नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना देखील परवानगी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिन २०२४ रोजी देशभरात ७५,००० वैद्यकीय जागा निर्माण करण्याचे…

  • अमित शाह यांची घोषणा; महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटींची मदत

    अमित शाह यांची घोषणा; महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटींची मदत

    नवी दिल्ली : पुर, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यांना तातडीने मदत म्हणून केंद्र सरकारने मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित सजग यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एसडीआरएफच्या वाटपाचा दुसरा हप्ता जाहीर केला. या अंतर्गत महाराष्ट्राला १,५६६.६० कोटी रुपये आणि कर्नाटकला ३४८.४० कोटी रुपये मंजूर करण्यात…

  • हिंगोलीत शिंदे गटाचा स्वबळाचा नारा; आमदार संतोष बांगर यांची घोषणा

    हिंगोलीत शिंदे गटाचा स्वबळाचा नारा; आमदार संतोष बांगर यांची घोषणा

    हिंगोली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिंदे गटाची शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी केली आहे. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे की, जिथे युती शक्य आहे तिथे करा; अन्यथा स्वबळाची तयारी ठेवा. त्यानुसार आम्ही कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत,” असे बांगर म्हणाले. ते पुढे म्हणाले,…

  • सायबर टोळीचा पर्दाफाश; इंटरनॅशनल कनेक्शन उघड

    सायबर टोळीचा पर्दाफाश; इंटरनॅशनल कनेक्शन उघड

    मुंबई : सायबर गुन्हेगारी जगतात मोठा पर्दाफाश करत मुंबई पोलीसच्या रफी अहमद किदवाई मार्ग पोलिसांनी “मार्को” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या युवकाला अटक केली आहे. या अटकेनंतर तब्बल ५८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा मोठा गुन्हा उघड झाला आहे. या रकमेचा मोठा हिस्सा बोगस बँक खात्यांद्वारे चीन व कंबोडियाला ट्रान्सफर केल्याचं पोलिस तपासात…

  • वाढत्या तापमानाचा धोका गंभीर; जगात ७५ दिवस, भारतात ३० दिवस उन्हाळा वाढणार

    वाढत्या तापमानाचा धोका गंभीर; जगात ७५ दिवस, भारतात ३० दिवस उन्हाळा वाढणार

    वाढत्या जागतिक तापमानाचा इशारा आता अधिक स्पष्ट झाला असून जगभरात सरासरी ७५ दिवस आणि भारतात सुमारे ३० दिवस उन्हाळा वाढणार असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. हवामानबदलावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी उपाययोजना न केल्यास ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. वाढलेले तापमान, अनपेक्षित उष्णतेच्या लाटा आणि सतत…

  • पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी शेकाप नेते जयंत पाटील दोषी; हर्षद कशाळकर यांना न्याय

    पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी शेकाप नेते जयंत पाटील दोषी; हर्षद कशाळकर यांना न्याय

    अलिबागहून पत्रकारांना प्रेरणा देणारा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास पुन्हा दृढ करणारा निकाल समोर आला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस व माजी आमदार जयंत पाटील यांना 2019 मध्ये लोकसत्ता दैनिकाचे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मतदान केंद्रात मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. घटनेच्या वेळी पाटील यांनी “तुम्ही पत्रकार काहीही छापता” असं म्हणत…

  • कोल्हापूर महिला सुधारगृहात धक्कादायक घटना; सहा नृत्यांगनांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

    कोल्हापूर महिला सुधारगृहात धक्कादायक घटना; सहा नृत्यांगनांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

    कोल्हापूर – कोल्हापूर शहरात एका महिला सुधारगृहात आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगनांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना उघड होताच पोलिस व प्रशासन तातडीने हालचालीला लागले. प्राथमिक माहितीनुसार, या सर्व महिलांना तत्काळ उपचारासाठी सीपीआररुग्णालय कोल्हापूर येथे…

  • जैन बोर्डिंग हॉस्टेल जमीनविक्री प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची एन्ट्री; न्यायाचं आश्वासन

    जैन बोर्डिंग हॉस्टेल जमीनविक्री प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची एन्ट्री; न्यायाचं आश्वासन

    पुणे शहरातील मोक्याच्या जागेवर असलेल्या जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जमिनीच्या विक्री प्रकरणावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. अनेक दशकांपासून वंचित समाजातील विद्यार्थ्यांना आसरा देणारी ही जमीन सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने विकल्याचा गंभीर आरोप जैन समाजाकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जैन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, या…