Category: News and Updates
-

देशातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी सायबर फसवणूक; ५८ कोटींना गंडवले
•
मुंबई : मुंबईतील ७२ वर्षीय वृद्ध शेअर दलालाला आभासी अटक दाखवून सायबर गुन्हेगारांनी तब्बल ५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. देशातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑनलाइन फसवणूक मानली जात आहे. याआधी २० ते २३ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद होती. तक्रारदार हे दक्षिण मुंबईत राहणारे व्यावसायिक…
-

सीईटी सेलची कारवाई! सीट ब्लॉकिंग प्रकरणात १५२ विद्यार्थ्यांपैकी फक्त १ ने सादर केली मूळ कागदपत्रं
•
मुंबई : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मोठ्या गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. CET सेलने १५२ विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. मात्र मुदत संपल्यानंतर फक्त एका विद्यार्थ्यानेच आपली मूळ कागदपत्रं सादर केली आहेत. या घटनेमुळे प्रवेश प्रक्रियेतील “सीट ब्लॉकिंग” घोटाळ्यावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. राज्य सरकारच्या CET सेलने…
-

भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचे निधन; राजकीय क्षेत्रात शोककळा
•
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. पहाटे अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना नगर शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे समजते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्यासह राज्यभरात हळहळ व्यक्त…
-

गुजरातमध्ये सत्तेचा मोठा ‘रिबूट’; मुख्यमंत्री सोडून सर्व १६ मंत्र्यांचा राजीनामा
•
गुजरातच्या राजकारणात दिवाळीच्या अगोदरच मोठा सत्तापालट झाल्याने राज्याच्या राजकीय पटावर खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पदावर कायम ठेवत इतर सर्व १६ मंत्र्यांनी एकत्रितपणे राजीनामा दिला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला हा फेरबदल ही केवळ मंत्रिमंडळ बदलाची कारवाई नसून एक योजनाबद्ध राजकीय डाव असल्याचं स्पष्ट होत आहे. या हालचालीमागे…
-

डिबेंचर कपातीविरोधात शेतकऱ्यांचा गोकुळवर मोर्चा; प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक
•
गोकुळ दूध संघच्या डिबेंचर कपातीच्या निर्णयावरून दूध उत्पादक शेतकरी आणि संघटनांमध्ये संघर्ष उफाळला आहे. डिबेंचर कपातीविरोधात शेतकऱ्यांनी गुरांसह ‘जवाब दो मोर्चा’ काढत प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. हा मोर्चा शासकीय विश्रामगृहापासून गोकुळच्या कार्यालयापर्यंत काढण्यात आला. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, गोकुळने डिबेंचर रकमेतील सुमारे 40 टक्के कपात केली असून यामुळे त्यांच्या उत्पन्नावर…
-

बुलढाण्यात बोगस मतदार? आमदार संजय गायकवाड यांचा निवडणूक आयोगावर घणाघात
•
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक बोगस मतदारांची नावे मतदारयादीत असल्याचा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. मृत व्यक्ती, स्थानांतरित अधिकारी यांची नावे अद्याप मतदारयादीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, निवडणूक आयोग बोगस नावे वगळण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. गायकवाड म्हणाले, “जिल्ह्यात…
-

युतीधर्म धोक्यात? बालाजी किणीकर यांचा भाजपला इशारा! “आमच्याकडेही यादी तयार आहे”
•
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असतानाच राज्यात पक्षबदलाचं सत्र जोरात सुरू झालं आहे. याच पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये मित्रपक्षांमध्येच राजकीय तणाव निर्माण झाला आहे. अलीकडेच शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भारतीय जनता पक्ष मध्ये प्रवेश केला. यामुळे स्थानिक राजकारणात हलचल माजली आहे. 2015 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले यादव नंतर…
-

मनसेला आघाडीत घेण्यावरून राऊत–सपकाळांमध्ये तणाव; काँग्रेस हायकमांडकडे तक्रार
•
महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) सामावून घेण्याबाबत मतभेद उफाळले आहेत. संजय राऊत यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात थेट काँग्रेसच्या हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सपकाळ यांनी मनसेला आघाडीत घेण्याबाबत नाराजी व्यक्त केल्याने हा वाद उफाळल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस वरिष्ठ नेत्यांना पत्र…
-

उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन, राजकीय चर्चांना उधाण
•
मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) दरवर्षी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करते. यंदाच्या दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दीपोत्सवावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. दरवर्षी दीपोत्सव…
-

भूपतीसह ६१ माओवादी आत्मसमर्पण, शहरी नक्षलवाद हेच खरं आव्हान : मुख्यमंत्री फडणवीस
•
गडचिरोलीत माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की बंदुकीचा नक्षलवाद संपत चालला असून आता शहरी नक्षलवाद हेच खरं आव्हान उरलं आहे. “अराजकतावाद्यांना आम्ही पराजित करू. संविधान न मानणाऱ्यांना बाबासाहेबांचं संविधान हरवेल,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. गडचिरोली पोलीस आणि राज्याच्या…
