Category: News and Updates
-

दोन भावांच्या वैरातून धाराशिवचे नुकसान; सरनाईकांचा निंबाळकर–पाटील घराण्यावर हल्लाबोल
•
धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात सध्या तापलेले वातावरण कायम असून, दोन प्रमुख राजकीय घराण्यांतील संघर्षामुळे जिल्ह्याचा विकास थांबल्याचा आरोप राज्याचे पालकमंत्री तथा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. उमरगा येथे शिवसेना उमेदवार किरण गायकवाड यांच्या प्रचारसभेत बोलताना सरनाईक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. निवडणुकांचा प्रचार अंतिम…
-

सर्वोच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा; गुडधेंची याचिका फेटाळली
•
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीविरोधात दाखल करण्यात आलेल्या कॉंग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी धक्कादायक फटका दिला. गुडधे यांनी फडणवीस यांच्या निवडणुकीत मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा आरोप करत निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका ग्राह्य न…
-

खासगी जमिनीवरील ‘वन’ संज्ञा हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
•
ठाणे, रायगड, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या खासगी जमिनीवरील ‘वन’ ही नोंद रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेली परवानगी हा ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीच्या जमिनीवर कर्ज, विक्री, बांधकाम, व्यवसाय किंवा शेतीविकासकामांसाठी आवश्यक परवानग्या मिळू शकत नव्हत्या. वनसंलग्न नोंदीमुळे जमीन सरकारी मालकीत असल्यासारखी अडवली…
-

इम्रान खान यांच्या मृत्यूची अफवा; भेटीवर बंदी, बहिणींवर लाठीचार्ज; पाकिस्तानात खळबळ
•
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांच्या तब्यतीबाबत गंभीर अफवा पाकिस्तानात वेगाने पसरत आहेत. आदियाला तुरुंगात (रावळपिंडी) 2023 पासून शिक्षा भोगत असलेल्या इम्रान खान यांचा तुरुंगातच मृत्यू झाल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार आहे. पाकिस्तानी लष्कराकडून त्यांना विष दिल्याचा दावा अनेक ठिकाणी केला जात असून त्यामुळे…
-

आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्यानंतर राज्यात वादाला तोंड
•
मुंबई : केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे ‘मुंबई की बॉम्बे’ हा जुना वाद पुन्हा एकदा पेटला आहे. “आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई करण्यात आलं नाही, यासाठी देवाचे आभार मानतो,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रीय…
-

गौरी पालवे मृत्यू प्रकरणात सेटलमेंटच्या हालचाली? अंजली दमानियांचा गंभीर आरोप
•
वरळी येथे डॉ. गौरी पालवे यांच्या मृत्यू प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी २२ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक तपास होता. मात्र गौरीच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू संशयास्पद ठरवत हत्या किंवा आत्महत्येस प्रवृत्त…
-

बॉलीवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; धर्मेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा
•
धर्मेंद्र यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. सोमवारी सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिव देहाला विले पार्ले येथील स्मशानभूमीत अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, या वेळी बच्चन कुटुंबासह अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थित राहून अंतिम निरोप दिला. धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती…
-

भाजप-शिंदे गटातील संघर्ष चिघळला; आमदार संजय गायकवाडांची घणाघाती टीका
•
बुलढाणा : बुलढाणा नगरपरिषद निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला असून भाजप व शिवसेना (शिंदे गट) समर्थकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांच्यावर केलेली टीका चर्चेचा विषय ठरली आहे. गायकवाड म्हणाले की, बुलढाण्यातील लढत ही भाजप-शिवसेनेतील नसून “उपऱ्या गटाच्या” नेत्यांविरुद्ध…
-

रेणापूर नगरपंचायतीत ठाकरे गटाला मोठा धक्का; ११ उमेदवारांची ऐनवेळी माघार, राजकारणात खळबळ
•
लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)ला मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह पक्षाचे तब्बल १६ पैकी ११ उमेदवारांनी निवडणुकीच्या तोंडावर माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याची नाराजी या उमेदवारांनी व्यक्त केली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पूर्ण ताकदीने लढण्याचे आदेश…
-

आमदार-खासदार आले की अधिकाऱ्यांनी ‘उठून अभिवादन’ करणे अनिवार्य, सरकारची नवीन नियमावली
•
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व सरकारी अधिकाऱ्यांसाठी नवीन शिष्टाचार नियमावली (जीआर) जारी केली आहे. यात आमदार आणि खासदार शासकीय कार्यालयात आल्यास अधिकाऱ्यांनी आपल्या आसनावरून उठून त्यांचे अभिवादन करावे, नम्र आणि आदरपूर्ण भाषा वापरावी, आणि त्यांच्याकडून आलेल्या पत्रांना निश्चित मुदतीत उत्तर द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व विभागांना पाठवलेल्या या जीआर…
