Category: News and Updates

  • धाराशिव-बीड-लातूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार; लाखो हेक्टर शेती पाण्यात

    धाराशिव-बीड-लातूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार; लाखो हेक्टर शेती पाण्यात

    मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे घरात व शेतात पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक जनावरांचेही जीव गेले आहेत. गोठ्यात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही प्रचंड झाले आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि औसा तालुक्यातील गावांना,…

  • आजपासून ओला-उबर चालक आकारणार सरकारमान्य भाडे

    आजपासून ओला-उबर चालक आकारणार सरकारमान्य भाडे

    मुंबई : अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ओला-उबरसारख्या कंपन्यांच्या दरांवर सरकारने अंकुश बसवला आहे. परिवहन विभागाने जाहीर केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार आजपासून चालकांनी फक्त सरकारमान्य दरानेच भाडे आकारायचे असून, त्याचे उल्लंघन केल्यास थेट कंपन्यांवरच कारवाई केली जाणार आहे. छोट्या गाड्यांसाठी किमान 28 रुपये आणि मोठ्या गाड्यांसाठी 38 रुपये बेसिक भाडे निश्चित…

  • पत्राचाळ घोटाळा : प्रवीण राऊत व जितेंद्र मेहता अडचणीत, PMLA न्यायालयाचा आदेश

    पत्राचाळ घोटाळा : प्रवीण राऊत व जितेंद्र मेहता अडचणीत, PMLA न्यायालयाचा आदेश

    मुंबईतील बहुचर्चित ₹१,०३९ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यामध्ये विशेष PMLA न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने प्रवीण राऊत, बिल्डर जितेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवीण राऊत हे शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांचे भाऊ आहेत. या प्रकरणाची सुरुवात २००७ मध्ये झाली. गुरूआशीष कन्स्ट्रक्शन्स (HDILची…

  • पद्मश्री अच्युत पालव यांचा नवरात्रोत्सवी अनोखा प्रयोग; ९ दिवस ९ पोस्टकार्ड

    पद्मश्री अच्युत पालव यांचा नवरात्रोत्सवी अनोखा प्रयोग; ९ दिवस ९ पोस्टकार्ड

    मुंबई : नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध सुलेखनकार आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त अच्युत पालव यांनी यावर्षी एक अनोखा प्रयोग साकारला आहे. महाराष्ट्र व गोवा सर्कलचे पोस्टमास्टर जनरल यांच्या वतीने नवरात्रीसाठी खास नऊ पोस्टकार्ड्स तयार करण्यात आली असून, या पोस्टकार्ड्सना सांस्कृतिक आणि कलात्मक स्पर्श देण्यात आला आहे. या पोस्टकार्ड्सची शब्दरचना रुपाली ठोंबरे,…

  • २४ टक्के भारतीय १४ वर्षांखालील, ६६ टक्के कामकाजाच्या वयोगटात

    २४ टक्के भारतीय १४ वर्षांखालील, ६६ टक्के कामकाजाच्या वयोगटात

    नवी दिल्ली : भारतातील लोकसंख्येच्या रचनेत मोठे बदल दिसत असून कामकाजाच्या वयोगटातील (१५-५९ वर्षे) लोकसंख्या तब्बल ६६.१ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. १९७१ मध्ये ही टक्केवारी सुमारे ५३ इतकी होती. नमुना नोंदणी प्रणाली (Sample Registration System) च्या २०२३ मधील सांख्यिकीय अहवालात ही माहिती समोर आली आहे. महिलांच्या बाबतीत हा आकडा पुरुषांच्या तुलनेत…

  • गाझा मदत निधीच्या नावाखाली ५ कोटींचा घोटाळा; भिवंडीत तीन जण अटकेत

    गाझा मदत निधीच्या नावाखाली ५ कोटींचा घोटाळा; भिवंडीत तीन जण अटकेत

    लखनऊ/ठाणे : उत्तर प्रदेश एटीएसने (Anti-Terrorism Squad) एक मोठा फसवणुकीचा कारनामा उघडकीस आणला आहे. ‘गाझा पीडितांना मदत’ या नावाखाली तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी गोळा करून तो वैयक्तिक वापरासाठी आणि संशयास्पद कामांसाठी वळविण्यात आल्याचे समोर आले आहे. ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे करण्यात आली. शनिवारी उशिरा रात्री एटीएसने भिवंडीमध्ये…

  • पालघरमध्ये १२ कोटींचे लाल चंदन जप्त; तस्करीचा मोठा प्रयत्न उधळला

    पालघरमध्ये १२ कोटींचे लाल चंदन जप्त; तस्करीचा मोठा प्रयत्न उधळला

    पालघर : पालघर जिल्ह्यातील वनविभागाने एका मोठ्या कारवाईत तब्बल १२ कोटी रुपयांचे लाल चंदन जप्त केले आहे. १८ सप्टेंबर रोजी रात्री दहिसर जंगल परिसरातील साखरे गावात असलेल्या एका सोडून दिलेल्या फार्महाऊसवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात सुमारे २०० गाठी लाल चंदनाच्या जप्त करण्यात आल्या. प्राथमिक चौकशीत समोर…

  • शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा सुरु; तेंडुलकरांनी केले उद्घाटन; राज ठाकरेही उपस्थित

    शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा सुरु; तेंडुलकरांनी केले उद्घाटन; राज ठाकरेही उपस्थित

    मुंबईतील क्रिकेट आणि मराठी संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा शिवाजी पार्क जिमखाना (SPG) नूतनीकरणानंतर सोमवारी पुन्हा सुरु झाला. या ऐतिहासिक क्षणाला क्रिकेटर भारतरत्न सचिन तेंडुलकर उपस्थित होते. त्यांनी रिबन कापून जिमखान्याचे उद्घाटन केले आणि उपस्थित प्रेक्षकांच्या गगनभेदी टाळ्यांचा वर्षाव झाला. सचिन तेंडुलकरांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

  • एच-१बी व्हिसा महाग; आयआयटी विद्यार्थ्यांसाठी नवे करिअर मार्ग खुले

    एच-१बी व्हिसा महाग; आयआयटी विद्यार्थ्यांसाठी नवे करिअर मार्ग खुले

    मुंबई : अमेरिकेतील महागड्या H-1B व्हिसामुळे भारतीय तंत्रज्ञान संस्थांचे (IIT) विद्यार्थी फारसे चिंतीत नाहीत. कारण IIT कॅम्पसवर येणाऱ्या फक्त ५ ते ७ टक्के भरती कंपन्या परदेशी आहेत, तर बाकी बहुतेक जागतिक दिग्गज कंपन्यांची कार्यालये आता बेंगळुरू, हैदराबाद किंवा गुढगावमध्येच असल्याने विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची सक्ती राहिलेली नाही. गेल्या तीन वर्षांत मोठ्या…

  • एआयमुळे महिलांच्या नोकऱ्यांवर मोठा धोका : संयुक्त राष्ट्राचा अहवाल

    एआयमुळे महिलांच्या नोकऱ्यांवर मोठा धोका : संयुक्त राष्ट्राचा अहवाल

    नवी दिल्ली : जगभर झपाट्याने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्रांतीचा महिलांच्या रोजगारावर पुरुषांच्या तुलनेत अधिक विपरित परिणाम होऊ शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या “जेंडर स्नॅपशॉट २०२५” या अहवालात देण्यात आला आहे. या अहवालानुसार, जगातील सुमारे २८ टक्के महिलांच्या नोकऱ्या AI मुळे धोक्यात आहेत, तर पुरुषांच्या फक्त २१ टक्के नोकऱ्यांना हा…