Category: News and Updates
-

‘सॉव्हरिन एआय’ उभारण्यात भारत सक्षम : एएमडीचे थॉमस झाचेरीया
•
भारत स्वतःची ‘सॉव्हरिन एआय’ प्रणाली विकसित करण्यासाठी अत्यंत सक्षम असल्याचे मत एएमडी (Advanced Micro Devices) चे वरिष्ठ उपाध्यक्ष थॉमस झाचेरीया यांनी व्यक्त केले. सुपरकंप्युटिंग इंडिया 2025 या परिषदेदरम्यान ते बोलत होते. झाचेरीया म्हणाले की, “भारताकडे प्रचंड प्रमाणात डेटा हा महत्त्वाचा संसाधन म्हणून उपलब्ध आहे. तसेच देशात संगणन क्षेत्रातील मजबूत पायाभूत…
-

सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश : हरवलेल्या मुलांवरील देशव्यापी सहा वर्षांची आकडेवारी सादर करा
•
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला देशातील हरवलेल्या मुलांबाबत मागील सहा वर्षांची संपूर्ण आकडेवारी सादर करण्याचे निर्देश दिले असून, यासाठी प्रभावी समन्वय घडवण्यासाठी गृह खात्यात एक समर्पित अधिकारी नियुक्त करण्याचेही आदेश दिले आहेत. गुरिया स्वयंसेवी संस्थेच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती बी. व्ही. नगरत्ना आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने ही सूचना केली.…
-

२०२५ मध्ये २,१६७ माओवादी आत्मसमर्पित; नक्षलवादाची ताकद क्षीण
•
नवी दिल्ली – देशातील डाव्या विचारसरणीच्या उग्रवादाचा प्रभाव सातत्याने कमी होत असल्याचे संकेत देणारी महत्त्वपूर्ण माहिती केंद्र सरकारने लोकसभेत मंगळवारी मांडली. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, सुरक्षा दलांच्या प्रभावी कारवायांमुळे आणि पुनर्वसन उपक्रमांमुळे २०२५ या वर्षात एकूण २,१६७ माओवादी कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले. २०१९ पासून आजपर्यंत ५,५७१ उग्रवाद्यांनी शस्त्रास्त्रे…
-

६५ नवी वसतिगृहे सुरू, उर्वरित जिल्ह्यांकडेही लक्ष; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
•
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्यात एकूण ६५ नवी वसतिगृहे यशस्वीरीत्या सुरू करण्यात आली आहेत. शिक्षणाच्या संधी वाढवणे आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित, सोयीस्कर राहण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा राज्य सरकारचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अनेक वर्षांपासून विविध…
-

भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना धमकीचे कॉल; तुकाराम मुंढे प्रकरण तापले
•
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कारवाईची मागणी करत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवण्याची तयारी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्याकडून सुरू असतानाच, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. तुकाराम मुंढे यांच्यावर निलंबनाची मागणी करणारे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना दोन अज्ञात व्यक्तींनी फोनवरून धमक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. “तुम्ही…
-

परिवर्तनाच्या चळवळीला जीवन समर्पित करणारे डॉ. बाबा आढाव यांचं ९५व्या वर्षी निधन
•
ज्येष्ठ समाजसेवक आणि समाजवादी नेता डॉ. बाबा आढाव यांचे ८ डिसेंबर रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. परिवर्तनाच्या चळवळीला जीवन समर्पित करणाऱ्या या ९५ वर्षीय नेत्यांवर आज (९ डिसेंबर) सायंकाळी ५.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव गुलटेकडी मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे सकाळी १० ते…
-

महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू
•
महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज नागपुरात सुरू होत असून यंदाचे अधिवेशन अनेक कारणांनी विशेष ठरणार आहे. प्रथमच दोन्ही सभागृहांचे कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय पार पडणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेत विरोधी पक्षनेता निवडीचा कोणताही उल्लेख नसल्याने विरोधकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांचे, तर विधानसभेसाठी शिवसेना…
-

हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार कृष्णा खोपडे तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची करणार मागणी
•
राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजप आमदार कृष्णा खोपडे हिवाळी अधिवेशनात निलंबनाची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असताना मुंढे यांनी शासनाकडून कोणतीही अधिकृत नियुक्ती नसताना स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार स्वतःकडे घेतल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार खोपडे यांनी केला आहे. नियमबाह्य…
-

प्रकाश बाळ जोशी यांना आंतरराष्ट्रीय फाईन आर्ट्स फेस्टिव्हलमध्ये गेस्ट ऑफ ऑनर म्हणून निमंत्रण
•
मुंबई : मुंबईतील प्रख्यात चित्रकार, लेखक आणि पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना यंदाच्या आंतरराष्ट्रीय फाईन आर्ट्स फेस्टिव्हलमध्ये गेस्ट ऑफ ऑनर म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. मोरोक्को येथे ९ ते १२ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या प्रतिष्ठित कला महोत्सवाच्या सातव्या आवृत्तीत जगभरातील नामांकित कलाकार सहभागी होणार आहेत. कला, संस्कृती आणि नवकल्पनांचा विविधतेने भरलेला…
-

डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती गंभीर पण स्थिर; कुटुंबीयांची हॉस्पिटलमध्ये गर्दी टाळण्याची विनंती
•
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणारे डॉ. बाबा आढाव यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना गेल्या दहा दिवसांपासून शहरातील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे आणि आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार सुरू…
