Category: News and Updates

  • शिरोडा-वेळागर किनाऱ्यावर भीषण दुर्घटना; आठ पर्यटक बुडाले, तिघांचा मृत्यू

    शिरोडा-वेळागर किनाऱ्यावर भीषण दुर्घटना; आठ पर्यटक बुडाले, तिघांचा मृत्यू

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर किनाऱ्यावर शनिवारी दुपारी पर्यटनासाठी आलेल्या आठ पर्यटकांच्या बुडण्याची भीषण घटना घडली. यापैकी तिघांचा मृत्यू झाला असून एक महिला पर्यटक गंभीर जखमी आहे. उर्वरित चार पर्यटकांचा शोध स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाकडून सुरु आहे. ही घटना दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. बेळगाव येथील कित्तूर कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांनी कुडाळ…

  • राज्यात नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत; ६ ऑक्टोबरला मंत्रालयात प्रक्रिया

    राज्यात नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत; ६ ऑक्टोबरला मंत्रालयात प्रक्रिया

    मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाबाबतची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नगरविकास विभागाने येत्या ६ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला असून, या प्रक्रियेकडे संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्यात एकूण २४५ नगरपालिका आणि ३९५ नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित होणार आहे. कोणत्या शहरात कोणत्या…

  • नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

    नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

    मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता देण्याची विनंती केली होती. पंतप्रधानांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून विमानतळाच्या नामकरणाची प्रक्रिया…

  • बेकायदा फलकांवरून न्यायालयाचा संताप; अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

    बेकायदा फलकांवरून न्यायालयाचा संताप; अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

    मुंबई : शहर आणि जिल्ह्यांमध्ये वाढत्या बेकायदा फलकांच्या तक्रारींवर योग्य ती कारवाई न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश देत शासनाला कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींनंतरही महानगरपालिका, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून कारवाई होत…

  • केंद्र सरकारने पशुखाद्य निर्यातीवरील बंदी उठवली; शेतकरी व उद्योगांना मोठा दिलासा

    केंद्र सरकारने पशुखाद्य निर्यातीवरील बंदी उठवली; शेतकरी व उद्योगांना मोठा दिलासा

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने पशुखाद्य उद्योगाला मोठा दिलासा दिला आहे. गेल्या एका वर्षापासून लागू असलेली तेलमुक्त तांदळाच्या कोंड्याच्या निर्यातीवरील बंदी अखेर हटवण्यात आली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) शुक्रवारी अधिसूचनेद्वारे हा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे देशातील पशुखाद्य उद्योग, प्रक्रिया उद्योग तसेच शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. खाद्यतेल उद्योग…

  • आजपासून चेक क्लिअरिंगला नवा वेग; काही तासांत खात्यात पैसे

    आजपासून चेक क्लिअरिंगला नवा वेग; काही तासांत खात्यात पैसे

    मुंबई : बँकिंग क्षेत्रातील ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आता चेक (धनादेश) क्लिअर होण्यासाठी दोन दिवस थांबावे लागणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेक क्लिअरिंग सिस्टीममध्ये केलेल्या सुधारणांमुळे आजपासून धनादेश काही तासांतच पास होऊन रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे. आरबीआयच्या नव्या नियमांनुसार शनिवारीपासून विद्यमान चेक ट्रान्झक्शन सिस्टीम (CTS) मध्ये…

  • विधानभवनातील मारहाण प्रकरण तपासाला उच्च न्यायालयाची स्थगिती

    विधानभवनातील मारहाण प्रकरण तपासाला उच्च न्यायालयाची स्थगिती

    मुंबई : जुलै महिन्यात विधानभवनाच्या आवारात भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादी गटातील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बुधवारी मरीन लाइन्स पोलिसांना पुढील तपास थांबविण्याचे आदेश दिले. १७ जुलै रोजी घडलेल्या या घटनेत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख…

  • “जयंत पाटील भाजपात आले तरी पडळकरचं त्यांना सिनियर” : चंद्रकांत पाटील

    “जयंत पाटील भाजपात आले तरी पडळकरचं त्यांना सिनियर” : चंद्रकांत पाटील

    सांगली : सांगली जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “जयंत पाटील भाजपमध्ये आले तरी गोपीचंद पडळकरच सांगलीत सीनियर ठरतील आणि जयंत पाटील ज्युनियर म्हणून मागेच राहतील.” सभेत…

  • मुंबईचा पुरातन वारसा ‘अलोकीक मुंबईचे ७५ वास्तुरत्न’ पुस्तकात

    मुंबईचा पुरातन वारसा ‘अलोकीक मुंबईचे ७५ वास्तुरत्न’ पुस्तकात

    मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक वारशाचा ठेवा आता पुस्तकाच्या रूपाने सर्वांसमोर आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने ‘अलोकीक मुंबईचे ७५ वास्तुरत्न’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मुंबईतील भव्य इमारती, वास्तू आणि वारसा स्थळांचा समृद्ध इतिहास जतन करण्यात आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी…

  • मतदार याद्या होणार त्रुटीमुक्त; मृत व्यक्तींची नावे हटवली जाणार : मुख्य निवडणूक आयुक्त

    मतदार याद्या होणार त्रुटीमुक्त; मृत व्यक्तींची नावे हटवली जाणार : मुख्य निवडणूक आयुक्त

    नवी दिल्ली : देशभरातील मतदार याद्या अचूक व त्रुटीमुक्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच सुरू होणाऱ्या विशेष पुनरावलोकन मोहिमेत (एसएसआर) जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा थेट निवडणूक यंत्रणेशी जोडला जाणार असून त्यामुळे मृत व्यक्तींची नावे मतदार याद्यांतून आपोआप हटवली जातील. निवडणूक आयोगाचे मत आहे की, अनेक वर्षांपासून लाखो…