Category: News and Updates
-
जेन-झी हिंसाचार चिंताजनक, श्रीमंत-गरीब दरीही धोकादायक : सरसंघचालक मोहन भागवत
•
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन-झी पिढीत वाढत चाललेल्या हिंसक प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली आहे. नागपुरात झालेल्या संघाच्या शताब्दी सोहळ्यात ते बोलत होते. जगभरातील अनेक देशांमध्ये या पिढीच्या सहभागामुळे हिंसाचाराच्या घटना वाढत असून, लोकशाहीच्या स्थैर्याला धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. भागवत म्हणाले की, अनेक…
-
शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळाच्या सवलती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
•
मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके, घरे, शेतीची जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांपुढे जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि विरोधकांकडून राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी होत होती. आज (३० सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ…
-
ऑरिक सिटीत आणखी ५० हजार कोटींची गुंतवणूक; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा
•
छत्रपती संभाजीनगर – दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत विकसित झालेल्या ऑरिक सिटीत आणखी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. सोमवार (२९ सप्टेंबर) रोजी शेंद्रा येथील ऑरिक टाउनहॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. सामंत यांनी सांगितले की, महाराष्ट्र हा देशातील सर्वाधिक औद्योगिक…
-
26/11 नंतर पाकिस्तानवर कारवाई अमेरिकेच्या दबावामुळे रोखली – पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट
•
26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करण्याचा विचार झाला होता, मात्र अमेरिकेच्या दबावामुळे ती योजना रद्द करण्यात आली, असा मोठा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्या काळात यूपीए सरकारमधील काही मंत्री आणि परराष्ट्र मंत्रालयाने राजनैतिक मार्गावर भर दिल्यामुळे…
-
“अभिजात मराठी, अभिमान मराठी” – जपानमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सन्मान सोहळा भव्य उत्साहात पार
•
मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर पहिल्यांदाच जपानमध्ये 23 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेला “अभिजात मराठी, अभिमान मराठी” हा आंतरराष्ट्रीय सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंच, जपान यांच्या संयुक्त विद्यमाने टोकियोतील इंडिया इंटरनॅशनल स्कूल इन जपान येथे हा ऐतिहासिक…
-
पूरग्रस्तांना तातडीचा दिलासा: महाराष्ट्र सरकारनं जिल्हा निधी तत्काळ वापरास परवानगी दिली
•
पूरग्रस्त भागातील जनजीवन लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं जिल्हानिहाय विकास योजनांसाठी राखीव असलेल्या निधीचा वापर तात्काळ मदत व पुनर्वसनासाठी करण्यास परवानगी दिली आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, जिल्हा नियोजन आणि विकास समितीचा (DPDC) निधी आता पूरानंतरच्या मदतकार्यासाठी वापरता येणार आहे. याआधी हा…
-
मुंबई महापालिका २२७ प्रभागांची अंतिम सीमा रचना ६ ऑक्टोबरला जाहीर होणार
•
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकांसाठी २२७ प्रभागांची अंतिम सीमा रचना (Demarcation) येत्या ६ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. नागरिकांकडून आलेल्या सुचना आणि हरकतींची सुनावणी यापूर्वीच करण्यात आली असून त्या राज्य शहरी विकास विभागाकडे (UDD) पाठवण्यात आल्या होत्या. या सुचना विचारात घेऊन सुधारित आराखड्याला राज्य निवडणूक आयोग (SEC) या आठवड्यात अंतिम मंजुरी…
-
आरबीआयच्या धोरणावर आणि टॅरिफ निर्णयावर बाजाराचे भवितव्य ठरणार
•
भारतीय शेअर बाजाराचा आगामी कल मोठ्या प्रमाणावर दोन महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून आहे – भारतीय रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण आणि अमेरिकेकडून होणारी टॅरिफ घोषणा. या दोन्ही घोषणांचा बाजारावर थेट परिणाम होणार असून, गुंतवणूकदारांचे लक्ष सध्या याच घडामोडींवर केंद्रीत आहे. याचसोबत पीएमआय औद्योगिक उत्पादनाचे आकडेही जाहीर होणार आहेत, ज्यामुळे बाजाराच्या हालचालींमध्ये आणखी…
-
लेहची घुसमट उफाळली : स्वायत्ततेच्या रद्दीकरणानंतर बेरोजगारी, अन्याय आणि असंतोषाने तरुणाई पेटली
•
लेहमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे रविवारी सलग पाचव्या दिवशी कर्फ्यू कायम राहिला. बाहेरून शांतता दिसत असली तरी आतून असंतोष उफाळलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेनंतर परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली असून तरुणांमध्ये सरकारविरोधी रोष वाढत चालला आहे. २४ सप्टेंबरला झालेल्या हिंसाचारात तीन तरुणांसह कारगिल युद्धातील अनुभवी जवान धर्मिंदर यांचा मृत्यू…
-
गोदावरीला पूरस्थिती, विष्णुपुरीचे १७ गेट उघडले; नदीने धोक्याची पातळी ओलांडली
•
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. विष्णुपुरी प्रकल्प परिसरात वाढलेल्या पाणलोटामुळे रविवारी सकाळी तब्बल १७ गेट उघडण्यात आले असून, ३ लाख ९ हजार १७४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, नदीकाठच्या अनेक वस्त्यांमध्ये…