Category: News and Updates
-

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाकडून मृत्युदंड
•
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने मानवतेविरुद्ध गुन्हे केल्याच्या आरोपात मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याने दक्षिण आशियातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. २०२४ मध्ये बांगलादेशात झालेल्या व्यापक आंदोलनादरम्यान सरकारी कारवाईत अनेक नागरिकांचा मृत्यु झाला होता. या घटनांमध्ये हसीना यांच्यावर निषेधकर्त्यांवर जीवघेणी आणि अत्यधिक दडपशाही करण्याचे आदेश दिल्याचा आरोप ठेवण्यात…
-

राजन साळवींच्या मुलाला उमेदवारी नकारली, रत्नागिरीत नवे राजकीय समीकरण
•
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या स्थानिक राजकारणात मोठा बदल घडवून आणणारा निर्णय समोर आला आहे. शिंदे सेनेचे राजन साळवी यांच्या मुलाला, अथर्व साळवी यांना, प्रभाग क्रमांक मधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींसाठी हा अनपेक्षित झटका मानला जात आहे. मिळालेल्या…
-

त्रिभाषा धोरणावर जनमत जाणून घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांचे आवाहन
•
मुंबई: महाराष्ट्र शासनाने राज्यातील शिक्षण व्यवस्थेमधील भाषिक धोरण अधिक सक्षम आणि समतोल करण्यासाठी “त्रिभाषा धोरण समिती”ची स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी राज्यातील सर्व सुजाण नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. समितीने https://tribhashasamiti.mahait.org/ या संकेतस्थळावर सर्वसामान्यांसाठी प्रश्नावली उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये नागरिकांच्या अपेक्षा,…
-

वाड्यातील प्रदूषणाच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांची दुटप्पी भूमिका
•
वाडा, पालघर : प्रदूषणाच्या वाढत्या तक्रारींमुळे चर्चेत असलेल्या वाडा तालुक्यातील टायर प्रोसेसिंग युनिट्सवर कारवाईची मागणी होत असताना, पालकमंत्र्यांच्या कार्यालयातून निघालेले एक पत्र सध्या मोठ्या वादाला तोंड फोडत आहे. संबंधित पत्रामध्ये टायर रिसायकलिंग कंपन्यांनी पर्यावरणपूरक पद्धतीने काम केल्याचे नमूद करून, त्यांना “अन्यायकारक कारवाईपासून संरक्षण” देण्याची विनंती करण्यात आली आहे. या पत्रामुळे…
-

ताथवडेतील १५ एकर शासकीय जमीन परस्पर विक्री; पुण्यात पुन्हा एकदा जमीन घोटाळा उघड
•
पुणे : राज्यात शासकीय जमिनींच्या गैरव्यवहारांच्या मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीत. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित अठराशे कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणानंतर आता पुण्यात आणखी एक मोठा जमीन घोटाळा समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे परिसरात पशुसंवर्धन विभागाची १५ एकर शासकीय जमीन परस्पर विक्री करण्यात आल्याचे उघड झाले आहे.…
-

पिपाणी चिन्ह यादीतून वगळल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा
•
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान “तुतारी वाजवणारा माणूस” या निवडणूक चिन्हासारखे दिसणारे “पिपाणी” चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासाठी मोठे डोकेदुखीचे ठरले होते. बीड आणि सातारा या दोन महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये या साधर्म्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता, ज्याचा फटका थेट शरद पवार यांच्या गटाला बसला. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
-

२५ लाख रुपये लाच प्रकरण; लिपिक अटक, न्यायाधीशांवर गुन्हा दाखल होणार
•
मुंबई : मुंबईतील दिवाणी सत्र न्यायालयातील लाचलुचपत प्रकरणामुळे न्यायव्यवस्थेत खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) न्यायालयातील लिपिकाला १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, लिपिकाने लाच घेतल्यानंतर संबंधित सत्र न्यायाधीशांना फोन करून “संमती” मिळाल्याचे सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाचा उलगडा तक्रारदाराच्या कंपनीच्या मालकीच्या…
-

शिर्डी साईबाबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अजय गौतम यांचा न्यायालयात माफीनामा
•
अहिल्यानगर : शिर्डी साईबाबा आणि साईबाबा संस्थानविषयी सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे दिल्लीचे अजय गौतम यांनी अखेर राहाता येथील न्यायालयात माफी मागितली आहे. त्यांनी न्यायालयासमोर हजर राहून आपली चूक मान्य करत म्हटले, “साईबाबा व साईबाबा संस्थानबाबत असलेले माझे गैरसमज दूर झाले असून, यापुढे मी कोणतेही चुकीचे वक्तव्य, मुलाखत, चर्चा किंवा…
-

एमसीए निवडणुकीत अजिंक्य नाईक गटाचा दबदबा; जितेंद्र आव्हाड उपाध्यक्ष
•
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत अजिंक्य नाईक गटाने मोठा विजय मिळवला आहे. उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली असून त्यांनी प्रतिस्पर्धी नवीन शेट्टी यांचा ४८ मतांनी पराभव केला. सचिवपदी उन्मेष खानविलकर यांनी २२७ मतांसह विजय मिळवत शाह आलम शेख यांचा पराभव केला. संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले २२८…
-

श्री संत मोतीराम महाराज संस्थानतर्फे १६ नोव्हेंबर रोजी संत पुरस्कार वितरण सोहळा
•
आळंदी— श्री क्षेत्र फळा , ता. पाळम, जि. परभणी येथील श्री संत मोतीराम महाराज संस्थान, शाखा आळंदी यांच्या वतीने आयोजित कार्तिकी वारीनिमित्त “संत पुरस्कार वितरण सोहळा” यावर्षी भव्य उत्साहात पार पडणार आहे. हा सोहळा शनिवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.…
