Category: News and Updates
-

मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर महिलेने केले गंभीर आरोप; शारीरिक छळ आणि धोका…
•
छ. संभाजी नगर : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांच्यावर एका महिलेने मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमक्या देत छळ केल्याचा आरोप केला आहे. संबंधित महिलेने सिद्धांतविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.सिद्धांत आणि माझे लग्न 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने झाले…
-

‘बाळासाहेब जिवंत असते तर मोदींना मिठी मारली असती’, अमित शहांचे मोठे विधान
•
नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी महाराष्ट्रातील नांदेड येथे म्हटले की, जर आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारली असती. नांदेड येथील सभेत अमित शहा बोलत होते. गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) वर हल्ला…
-

नीती आयोगाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचा रोडमॅप सादर केला
•
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राजधानी नवी दिल्ली येथे झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी एक नवीन रोडमॅप सादर केला. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘विकसित भारत २०४७’ चे ध्येय साध्य करण्यासाठी, महाराष्ट्र केंद्र सरकार आणि सर्व राज्यांसोबत एकत्र काम करून ‘विकास आणि वारशाचे स्वप्न’…
-

३५ वर्षांत पहिल्यांदाच मान्सून लवकर दाखल, मुंबईत ९६ इमारती धोकादायक घोषित
•
मुंबई: गेल्या ३५ वर्षांत पहिल्यांदाच महाराष्ट्रात मे महिन्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. हवामान खात्याने याची पुष्टी केली आहे. आयएमडीच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर म्हणाल्या की, १९९० मध्ये नैऋत्य मान्सून २० मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला होता. पुढील काही दिवसांत मुंबईत मुसळधार पावसासह तो पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे.हवामान खात्याने मुंबई आणि…
-

मुंबईतील मुसळधार पावसाचा केईएमला फटका; रुग्णालयात पाणी शिरले
•
मुंबई : महाराष्ट्रात मे महिन्यातच पावसाने घातलेल्या धुमकुळाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या पावसामुळे अनेक भागात नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे. या पावसाच्या पाण्याचा फटका आता चक्क केईएम रुग्णालयाला ही बसल्याचे बघायला मिळाले आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे केईएम रुग्णालयातील तळमजल्यात पाणी साचले आहे. पावसाचे पाणी अगदी तळमजल्यापर्यंत…
-

मुंबईसाठी हवामान विभागाने इशारा बदलला; येलो ऐवजी रेड अलर्ट जारी
•
मुंबई : मे महिन्यातच पावसाने घातलेल्या धुमकुळाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रविवारी हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड या भागांना येल्लो अलर्ट दिला होता. मात्र सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे हवामान विभागाने आपला अंदाज बदलला आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड येथे हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला…
-

माजी सरपंच आणि त्याच्या मुलाने 3 महिलांसह 2 पुरुषांना केली बेदम मारहाण
•
बीड:तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या वंजारवाडी येथील सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडुन तीन महिलांसह दोन पुरुषांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली आहे. मारहाण झालेल्या सर्व जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. वंजारवाडी गावात ग्रामपंचायतीच्यावतीने शुक्रवारी गावात आणि रस्त्यालगत झाडे लावण्यात आली. यासाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. परंतु कुंडलिक…
-

ठाण्यात मागील 24 तासात 11 कोरोनाबाधित रुग्ण आढळले; चिंता वाढली
•
ठाणे : कोरोना या महाभयंकर रोगाने पुन्हा तोंड वर करायला सुरुवात केली आहे. राज्यात बधितांची संख्या वरच्यावर वाढत चालली आहे. एकट्या ठाण्यात मागील 24 तासात 11 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे चिंता वाढली आहे. या 11 बाधित रुग्णांपैकी एकावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात, तर उर्वरित सहा जणांवर खासगी…
-

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी चौंडीत येणार
•
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी ३१ मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. राज्याचे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे त्यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर सभापती राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद…
-

शरद पवार गटाला पाटणमधून मोठा धक्का; हा नेता भाजपच्या वाटेवर
•
सातारा : जिल्ह्यातील पाटणमध्ये शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण पक्षाचे पाटण येथील महत्वाचे नेते आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजित पाटणकर भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. सत्यजीत पाटणकर हे गेल्या काही वर्षांपासून…
