कोस्टल रोडवरील होर्डिंगविरोधात रहिवाशांची ऑनलाइन याचिका

महाराष्ट्र कोस्टल झोन व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) कोस्टल रोड लगतच्या जाहिरात फलकांना दिलेल्या मंजुरीविरोधात ब्रीच कँडी आणि नेपियन सी रोड येथील रहिवाशांनी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की हा निर्णय नव्याने उभारलेल्या या पायाभूत सुविधांच्या सौंदर्याला मारक ठरतो, तसेच सुशासन, पर्यावरणीय कायदे आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या तत्त्वांचे उल्लंघन करतो. याचिकेत प्रकाश प्रदूषण, परिसर विद्रुपीकरण यांसारख्या सहा प्रमुख समस्या नमूद केल्या आहेत. बुधवारी याचिका दाखल झाल्यानंतर काही मिनिटांतच ८४५ नागरिकांनी या याचिकेला पाठिंबा दिला.
एमसीझेडएमएने अलीकडेच कोस्टल रोडलगत मोकळ्या जागांच्या शेजारी मुंबई महापालिकेने प्रस्तावित केलेल्या जाहिरात फलकांना परवानगी दिली. दक्षिण मुंबईतील टाटा गार्डन, ॲमेझॉन गार्डन आणि लाला लजपतराय गार्डन यांसारख्या ठिकाणी या होर्डिंग्ज उभारण्याचा प्रस्ताव आहे. एमसीझेडएमएच्या मते, ही जागा कोस्टल नियमन झोन (सीआरझेड-२) अंतर्गत येते, त्यामुळे होर्डिंग्ज केवळ रस्त्याच्या कडेला किंवा अस्तित्वात असलेल्या बांधकामांवर उभारता येतील. नियमांचे पालन होईल याची जबाबदारी महापालिकेवर असेल.
ब्रीच कँडी येथील एका गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आणि ब्रीच कँडी रहिवासी मंचाचे सदस्य राजेश दहिया यांनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, ही याचिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांना खुले पत्र आहे. लोढा हे या भागाचे आमदार आहेत. “मुंबईकर म्हणून आम्हाला आमच्या शहराच्या विकासाचा अभिमान आहे. मात्र, हा अभिमान शहराचा वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि सामूहिक कल्याण यांशी निगडीत आहे. सार्वजनिक विश्वासाचे रक्षण करणाऱ्या जबाबदार व्यक्ती म्हणून आम्हाला विश्वास आहे की तुम्ही हा निर्णय मागे घेण्यासाठी ठोस पाऊल उचलाल. कोस्टल रोड नावीन्य आणि टिकाऊपणाचा वारसा जपणारा ठरावा, तो सौंदर्यहानी व पर्यावरणीय हानी करणारा नाही,” असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
रहिवाशांनी अधिकाऱ्यांना त्वरित फेरविचार करण्याची, सार्वजनिक सल्लामसलत घेण्याची आणि कोस्टल रोडला मुंबईच्या प्रगतीचे व अभिमानाचे प्रतीक राहू देण्याची विनंती केली आहे. त्यांनी सांगितले की कोस्टल रोड व्यावसायिक जाहिरातींनी भरलेला नाही तर पर्यावरणपूरक आणि सौंदर्यपूर्ण ठरावा…

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *