शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या माजी पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या जामीन अर्जाला न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील न्यायिक दंडाधिकारी (प्रथम वर्ग) न्यायालयाने (JMFC) सरकारी पक्षाच्या युक्तिवादाचा स्वीकार करत कोरटकर यांच्या जामिनास नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रशांत कोरटकर यांना २४ मार्च रोजी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर रविवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. त्यांनी जामिनासाठी JMFC न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की, आरोपीला जामीन मंजूर केल्यास तो खटल्यातील पुराव्यांमध्ये फेरफार करू शकतो तसेच तपासात अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे. भारतीय न्याय संहितेनुसार, तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर करण्यासंबंधीच्या कायद्यांचा संदर्भ देत सरकारी पक्षाने जामीन नाकारावा, अशी मागणी केली.

न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत कोरटकर यांच्या जामीन अर्जास फेटाळले. आरोपी सध्या कळंबा कारागृहात प्रशांत कोरटकर हे नागपूरचे रहिवासी असून, सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहात आहेत. त्यांच्यावर इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात फिर्यादी पक्षाचे वकील असीम सरोदे यांनी न्यायालयास सांगितले की, आरोपीला जामीन मिळाल्यास तो आपल्या राजकीय संबंधांचा गैरवापर करून खटल्यातील पुरावे नष्ट करू शकतो आणि तपासात अडथळा निर्माण करू शकतो. कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे, ज्यात समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि गटांमध्ये शत्रुत्व वाढवणाऱ्या कलमांचा समावेश आहे. या प्रकरणाचा सविस्तर तपास कोल्हापूर पोलीस करत असून, पुढील न्यायालयीन कार्यवाही लवकरच होणार आहे. जामीन अर्ज फेटाळल्याने कोरटकर यांना सध्या कारागृहातच राहावे लागणार आहे

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *