देशातील १ लाख तरुणांना राजकारणात आणणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा…

देशातील तरुणांनी तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात जसे नेतृत्व केले तसे राजकारणात देशाचे नेतृत्व करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. गुजरातमधील रामकृष्ण मठ येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी आगामी काळात १ लाख प्रतिभावान आणि उत्साही तरुणांना राजकारणात आणण्याच्या सरकारच्या संकल्पावर प्रकाश टाकला.

तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांसोबतच, आपल्या तरुणांनी राजकारणातही आपल्या देशाचे नेतृत्व करणे आवश्यक आहे कारण आपण ते फक्त घराणेशाहीच्या राजकारणावर विश्वास ठेवणाऱ्यांवर सोडू शकत नाही. जे राजकारणाला आपल्या कुटुंबाची संपत्ती मानतात त्यांच्याकडे आपण राजकारण सोपवू शकत नाही.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“१२ जानेवारी २०२५ रोजी, स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त, दिल्लीतील युवा नेत्यांच्या संवादात सहभागी होण्यासाठी देशभरातील २००० निवडक तरुणांना आमंत्रित केले जाईल.“प्रतिभावान आणि उत्साही तरुणांना राजकारणात समाकलित करण्यासाठी एक रोडमॅप असेल. आगामी काळात एक लाख तरुणांना राजकीय भूमिकेत आणण्याची आमची वचनबद्धता आहे. २१ व्या शतकातील भारताच्या नव्या चेहऱ्याचे प्रतिनिधित्व करतील आणि आपल्या भविष्याचे शिल्पकार असतील,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *