दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून, तिच्या आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. याचिकेत दिशावर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी दिशाच्या वडिलांनी कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले होते. मात्र, आता त्यांनी न्यायालयात धाव घेत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांना नजरकैदेत ठेवले आणि तपासावेळचे पुरावे खरे मानण्यात भाग पाडले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी दबाव टाकल्याचा आरोपही दिशाच्या वडिलांनी केला आहे.
या नव्या घडामोडींवर मंत्री नितेश राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत दिशाच्या मृत्यूबाबत पुन्हा गंभीर दावे केले आहेत. राणे म्हणाले, मी आधीपासून सांगत होतो की दिशाचा खून झाला होता. ८ जूनला आदित्य ठाकरेंचं मोबाईल लोकेशन तपासा. त्या दिवशी तिथल्या वॉचमनचं काय झालं, हे मी सतत विचारत होतो. आता दिशाच्या वडिलांनीच न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप करणारे आता काय बोलणार? असा सवालही राणे यांनी केला
Leave a Reply