बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या पक्क्या घराचे भूमिपूजन मंगळवारी पार पडले. आपल्या गावातील ग्रामस्थांचे घर पक्के असेल तेव्हाच मी स्वतः घर बांधेन असा संकल्प सरपंच संतोष देशमुख यांचा होता. त्यांचं राहतं घर 1980 साली त्यांच्या पूर्वजांनी बांधलेलं होतं. संतोष देशमुख यांची इच्छा अपूर्ण राहिल्याने त्यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबातील सदस्यांना वास्तव्यासाठी पक्के घर देऊ असा शब्द शिवसेना शिंदे गटाने दिला होता. अखेर उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून देशमुख यांच्या घराचे भूमिपूजन पार पडले आहे . श्रीक्षेत्र नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज ,भगवान महाराज यांच्यासह जिल्हाप्रमुख अनिल जगताप सचिन मुळे यांच्या हस्ते संतोष देशमुख कुटुंबीयांच्या घराचे भूमिपूजन पार पडले.
देशमुख कुटुंबीयांना वास्तव्यासाठी पक्के घर देण्याचं वचन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. या कुटुंबाला धीर देण्यासाठी आणि शासनाचं कर्तव्य म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशमुख कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर त्यांना घर बांधून देणार असल्याचं जाहीर केलं होतं .आता या घराच्या जागेचं भूमिपूजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुखांनी माध्यमांना दिली . देशमुख यांच्या निधनानंतर शिवसेना शिंदे गटाने देशमुख कुटुंबाला शब्द दिला होता. आणि तो शब्द आता पूर्ण करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार महिन्यात देशमुख कुटुंबाचे मसाजोग गावात पक्के घर असणार आहे. असेही शिंदेगटाकडून सांगण्यात आले आहे.
त्याप्रमाणे मस्साजोगमध्ये प्राथमिक शाळेच्या बाजूला असलेल्या ३० बाय ४० जागेत दोन मजली घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेत पक्षाच्या वतीने हे बांधकाम करून देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मंगळवारी श्री. क्षेत्र नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ह.भ.प. भगवान महाराज, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, अनिल जगताप, स्वप्नील गलधर, धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a Reply