‘महायुतीत बेबनाव आहे का?’, एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगून टाकलं

मुंबई : मागील काही दिवसांपासून महायुती अर्थात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या दबक्या आवाजात येत राहतात. अशात महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याची देखील चर्चा आहे. मात्र याबद्दल एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं. एकनाथ शिंदे म्हणाले ‘महायुतीत कुठलाही बेबनाव किंवा नाराजी नाही. महायुती सरकारला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे आमची जबाबदारी वाढली आहे, अडीच वर्षीत केलेली कामे पाहून विरोधकांना पुढील पाच वर्षीचा अंदाज आला आहे. त्यामुळेच महायुतीत बेबनाव आणि नाराजी असल्याच्या बातम्या पसरवत आहेत. मात्र, महायुतीमध्ये कोणीही नाराज नाही.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे 2100 रुपये देणारच.त्यासाठी आर्थिक आखणी सुर आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. महायुती सरकरने पाच वर्षाची दिशा ठरवलेली आहे. त्याच मार्गाने सरकार मार्गक्रमण करत आहे. मात्र, विरोधक दिशाहीन आणि गोंधळले आहेत. विरोधकांनी राजकारण न करता जनतेचे प्रश्न गांभीर्याने मांडावेत त्यांना सरकारचे सहकार्य असेल, असे शिंदे म्हणाले.

फितरत हमारी सहन करने की न होती, तो हिमत आपकी बोलने की ना होती. अशी शायरी म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. इतकंच नाही तर ते म्हणाले काही टुरिस्ट म्हणून येतात आणि जातात आणि पायऱ्यांवर चॅनेलचा बुम बघून धूम ठोकतात, असंही ते म्हणाले. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी देखील महायुतीत बेबनाव नसल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या कामांना फडणवीस यांनी स्थगिती दिल्याच्या आरोपावर बोलताना फडणवीस म्हणाले ‘कामांना स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का?”

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *