मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरीचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयोगाकडून सांगितले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी थेट पत्र लिहिले तरच ही संवैधानिक संस्था उत्तर देईल. त्यांनी सांगितले की, त्यांच्या संपर्क मोहिमेचा भाग म्हणून, निवडणूक आयोगाने सर्व 6 राष्ट्रीय पक्षांना स्वतंत्र चर्चेसाठी आमंत्रित केले होते, तर इतर 5 पक्षांनी आयोगाच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली होती, परंतु काँग्रेसने 15 मे रोजी ही बैठक रद्द केली.
राहुल गांधी यांचे आरोप निवडणूक आयोगाकडून यापूर्वी फेटाळून लावले होते. याला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांनी शनिवारी म्हटले होते की, गोष्टी लपवून नव्हे तर सत्य बोलून त्यांची विश्वासार्हता वाचविली जाईल. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी दोन वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहून आरोप केला होता की 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लोकशाहीमध्ये हेराफेरी करण्याचा एक ब्लूप्रिंट आहे. त्यांनी म्हटले होते की, आता बिहारमध्येही ही मॅच फिक्सिंगची पुनरावृत्ती होईल. मग ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव होत आहे तिथेही असेच केले जाईल.
सीसीटीव्ही फुटेजच्या मागणीवर दिले हे उत्तर
काँग्रेस नेत्याने महाराष्ट्रातील मतदान केंद्रांचे संध्याकाळचे सीसीटीव्ही फुटेज देखील मागितले होते. या प्रश्नाच्या उत्तरात सूत्रांनी सांगितले की, निवडणूक याचिकेच्या बाबतीत मतदान केंद्रांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केवळ सक्षम उच्च न्यायालयच करू शकते. आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘निवडणुकीच्या पवित्रतेचे तसेच मतदारांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी निवडणूक आयोग हे करते. राहुल गांधी मतदारांच्या गोपनीयतेचे उल्लंघन का करू इच्छितात, जे निवडणूक कायद्यानुसार निवडणूक आयोगाला संरक्षित करावे लागते?’ ते म्हणाले की, कोणत्याही अनियमिततेला तोंड देण्यासाठी राहुल गांधींनी उच्च न्यायालयांवर अवलंबून राहावे.


Leave a Reply