कळंब – राज्यात आजपासून शाळेला सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील भटशिरपुरा गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मोठ्या थाटात हा पहिला दिवस साजरा करण्यात आला. पहिलीच्या वर्गात प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायला जिल्ह्याचे क्लेक्टर कीर्तिकिरण पुजार, आमदार कैलास पाटील, जिल्हा परिषद सीईओ मैनाक घोष, शिक्षणाधिकारी अशोक पाटील गावात आले होते. इतकंच नाही तर शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थी यांचा वरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यादरम्यान पहिल्या दिवशी शाळेच्यावतीने गावातून वारकरी भजनी मंडळीनी टाळ मृदंगाच्या निनादात भव्य शोभायात्रा काढून ग्रंथाची व वृक्षाची पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. विठ्ठल- रुक्मिणी, ज्योतिबा- सावित्री यांची व छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा घातलेले विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांची घोड्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी शिक्षक व विद्यार्थ्यांनी फुगडी देखील खेळली. सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. हा आगळावेगळा सोहळा पाहण्यासाठी गावकरी देखील मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
यांची होती उपस्थितती
जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, आमदार कैलास पाटील, सीईओ मैनक घोष, शिक्षणधिकारी अशोक पाटील, गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमते, शिक्षण विस्तार अधीकारी दत्तप्रसाद जंगम, मल्हारी माने सरपंच सुनीता वाघमारे, उपसरपंच सूर्यकांत खापे, चेअरमन अच्युत गायकवाड, शाळांव्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रियांका गायकवाड, शिवराज गायकवाड,अतुल गायकवाड प्रतिक गायकवाड व्हा. चेअरमन ग्रामसेवक लक्ष्मी सोनवणे अमोल सिरसट, ह भ प विशाल महाराज वाघमारे,श्रीकांत गायकवाड यांच्यासह भजनी मंडळ व गावातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी घेतले परिश्रम
शाळेतील शिक्षक शहाजी बनसोडे,सचिन तामाने, श्रीकांत तांबारे, अमोल बाभळे, राजाभाऊ शिंदे, लिंबराज सुरवसे, श्रीम.प्रमोदनी होळे श्रीम.रंजना थोरात श्रीम. राजकन्या वाघमारे या शिक्षक व शैक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांनी तर सूत्रसंचलन शाळेच्या विद्यार्थिनी समृद्धी गायकवाड व संध्या जाधव यांनी केले तर आभार आनम शेख हिने मानले


Leave a Reply