‘इंडियाज गॉट लॅटेंट’ वाद चिघळल्यानंतर मुंबई पोलिसांनी खार येथील स्टुडिओवर धडक कारवाई केली. या शोच्या वादग्रस्त विधानांमुळे पोलिसांची विशेष टीम स्टुडिओत पोहोचली असून, तिथे तपास सुरू असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
वादाचा केंद्रबिंदू; यूट्यूबर रणवीर इलाहाबादिया
प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर इलाहाबादिया यांच्या शोमध्ये करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे हा वाद पेटला आहे. दिल्लीतील सीपीआय खासदार पी. संदोष कुमार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “अशा अनेक यूट्यूबर्स समाजाची दिशाभूल करत आहेत. हा त्यांचा घाणेरडा व्यवसाय आहे, आणि समाजाला याची मोठी किंमत चुकवावी लागत आहे.”
रणवीर इलाहाबादिया, अपूर्व मखीजा, समय रैना यांच्यावर तक्रार
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ शोच्या आयोजकांविरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्टँड-अप कॉमेडियन समय रैना यांच्या या लोकप्रिय शोमध्ये वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून यूट्यूबर रणवीर इलाहाबादिया यांच्यासह अपूर्व मखीजा आणि समय रैना यांच्यावरही तक्रार नोंदवण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची कठोर भूमिका
या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ काहीही बोलण्याचा मुळीच नाही. समाजासाठी काही नियम ठरवले गेले आहेत, आणि जर कुणी त्याचे उल्लंघन करत असेल, तर त्यावर कठोर कारवाई होईल.”
Leave a Reply