पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप समोर आले आहेत. भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहायक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू होण्यामागे रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरून रुग्णालयाचे प्रशासन अडचणीत आले असून, राज्य सरकारने नेमलेल्या पाच सदस्यीय समितीने प्रारंभिक अहवाल सादर केला आहे.
समितीच्या अहवालानुसार, रुग्णाला तत्काळ दाखल न करून त्याच्याकडून अनामत रक्कम मागणे हे नर्सिंग होम अॅक्टच्या नियमांचे उल्लंघन आहे, अशी तीव्र टीका अहवालात केली आहे. रुग्णालयाच्या या चुकीमुळे गर्भवती महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. अहवालात म्हटले आहे की, रुग्णाला तात्काळ दाखल करून घेतले असते तर परिस्थिती वेगळी असू शकली होती. या प्रकारामुळे रुग्णालयावर गंभीर आरोप झाले असून, संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई होण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.
याच पार्श्वभूमीवर, शासनाने नेमलेल्या चौकशी समितीवर वाद निर्माण झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी डॉ. राधाकृष्ण पवार यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, डॉ. पवार यांच्यावर आधीच काही तक्रारींच्या आधारे आरोप झाले होते, आणि आरोग्य विभागाने त्याबाबत चौकशी करून प्रकरण दडपले होते. त्यामुळे निष्पक्ष चौकशी होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली आहे.
Leave a Reply