भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील एक प्रमुख नाव आणि भारतातील सर्वात गुणी संशोधकांपैकी एक, प्रा. जी . डी. यादव यांना ‘इमिनंट इंजिनिअर अवॉर्ड’ जाहीर करण्यात आले आहे. अभियंता परिषदेने (ECI) त्यांच्या संशोधन व सल्लागार सेवांतील योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला आहे. २८ एप्रिल रोजी दिल्लीतील अभियंता परिषदेत होणाऱ्या “स्थापना दिवस” कार्यक्रमात त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला जाईल.
सध्या ते राष्ट्रीय विज्ञान चेअर (भारत सरकार), एलआयटी युनिव्हर्सिटी, नागपूरचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, यादव यांना अलीकडेच काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) कडून प्रतिष्ठित भटनागर फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, नवकल्पना आणि धोरण या क्षेत्रांतील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान जागतिक पातळीवर ओळखले जाते, आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात १५० हून अधिक पुरस्कार मिळवले आहेत.
महाराष्ट्र रिसर्च सेंटर तर्फे पद्मश्री यादव सरांचे हार्दिक अभिनंदन.

एलआयटीयू चेअरमन जी डी यादव यांना ‘इमिनंट इंजिनिअर अवॉर्ड’
•
Please follow and like us:
Leave a Reply