गुजरात जायंट्सने धारावीची युवा क्रिकेटर सिमरन शेख हिच्यावर पैशांचा पाऊस पाडला आहे!
धारावीत राहणाऱ्या सिमरनने शिक्षण सोडून क्रिकेटची निवड केली हे विशेष. तिने आपले आयुष्य झोपडपट्टीत घालवले आहे. पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आता ती एक प्रतिभावान क्रिकेटर बनली आहे. गुजरातने सिमरनला मूळ किमतीपेक्षा १९ पट अधिक किंमतीत विकत घेतले आहे. महिला प्रीमियर लीग लिलावात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सिमरन शेखवर पहिली बोली लावली. दिल्लीने १० लाख रुपयांची बोली लावली. ही सिमरनची मूळ किंमत होती. यानंतर गुजरात जायंट्स या बोलीत सामील झाले. दिल्लीने १.८० कोटी रुपयांची शेवटची बोली लावली.पण गुजरातने १.९० कोटींची बोली लावून सिमरनला आपल्या संघात घेतले. अशाप्रकारे, सिमरनला मूळ किंमतीपेक्षा १९ पट अधिक पैसे मिळाले. सिमरनचे वडील जाहिद अली यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, सिमरनला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. ती खेळताना अनेक जण तिला बरे वाईट बोलायचे. पण सिमरनने सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले, मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिमरनने १०वीनंतर शिक्षण सोडले होते.
सिमरन ही मधल्या फळीतील फलंदाज आहे. गेल्या हंगामात तिला खरेदीदार मिळाला नाही. पण या मोसमात मोठी रक्कम मिळाली. तिने WPL मध्ये आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले आहेत. या काळात तिला ७ डावात फलंदाजीची संधी मिळाली. पण ती विशेष काही करू शकलो नाही. सिमरन महिला प्रीमियर लीगमध्ये “यूपी वॉरियर्स” महिला संघाकडून खेळली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती मुंबईकडून खेळते. आता चांगली चर्चेत आल्यानंतर सगळ्यांचे लक्ष सिमरंनच्या खेळाकडे लागले आहे .
Leave a Reply