भारतातील ५७% हून अधिक कॉर्पोरेट पुरुषांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता – नव्या अभ्यासाचा गंभीर इशारा

भारतीय शहरी भागातील कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांमध्ये व्हिटॅमिन B12 ची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याचे एका नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. न्यूरोलॉजिकल कार्यप्रणाली आणि ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असलेले हे जीवनसत्त्व ५७.१६% पुरुषांमध्ये कमी प्रमाणात आढळले आहे. महिलांमध्येही ही समस्या गंभीर असून ४९.९% महिलांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता आढळली आहे.

भारतीय डिजिटल आरोग्यसेवा कंपनी मेडीबडी यांच्या अहवालानुसार, ४० ते ५० वयोगटातील ४,४०० व्यावसायिकांच्या आरोग्यविषयक डेटाचे विश्लेषण करण्यात आले. यामध्ये ३,३३८ पुरुष आणि १,०५९ महिलांचा समावेश होता. या संशोधनातून लक्ष्यभूत आरोग्य हस्तक्षेप (Targeted Health Interventions) आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुरुषांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता का?

१) शरीरातील शोषण प्रक्रियेतील अडथळे

पचनसंस्थेच्या समस्यांमुळे शरीरात व्हिटॅमिन B12 योग्य प्रमाणात शोषले जात नाही.

वाढत्या वयानुसार पचनासाठी आवश्यक असलेल्या आम्लांचे उत्पादन कमी होते.

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकार, अँटासिड्स आणि मेटफॉर्मिनसारख्या औषधांचा दीर्घकाळ वापर यामुळेही शोषण प्रक्रियेत अडथळे येतात.

आतड्यांतील मायक्रोबायोम असंतुलन हे देखील महत्त्वाचे कारण ठरते.

२) आहारातील सवयी

शाकाहारी किंवा व्हेगन आहार पाळणाऱ्या व्यक्तींमध्ये B12 कमतरतेचा धोका अधिक असतो.

हे जीवनसत्त्व प्रामुख्याने मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळते. दूध आणि अंडी खाणाऱ्या लोकांनाही फोर्टिफाइड अन्न किंवा पूरक आहाराशिवाय पुरेसे B12 मिळणे कठीण होते.

३) जीवनशैली आणि तणावाचा परिणाम

अनियमित आहार, मद्यपान, तंबाखू सेवन आणि उच्च तणावग्रस्त नोकरीमुळे B12 ची पातळी घसरते.

सतत बसून राहण्याची सवय चयापचय प्रक्रियेसाठी हानिकारक ठरू शकते.


मेडीबडीच्या वैद्यकीय ऑपरेशन्स प्रमुख डॉ. गौरी कुलकर्णी यांच्या मते, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी वेळेत योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत.

त्यांनी पुढे सांगितले की, आरोग्य तपासणी, डिजिटल हेल्थ ट्रॅकिंग आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांचा अवलंब केल्यास आरोग्य सुधारण्यात मदत होऊ शकते.

भारतामध्ये कॉर्पोरेट क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असताना, वैयक्तिकृत आरोग्य मूल्यमापन आणि नियमित हेल्थ चेकअप अत्यावश्यक ठरत आहे. चयापचयाशी संबंधित तपासण्या करून B12 कमतरता वेळीच ओळखणे आणि संभाव्य गंभीर आजार टाळणे शक्य आहे.

पुरुषांमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती अधिक दिसून येते, त्यामुळे त्यांनी आहारात योग्य सुधारणा कराव्यात आणि आवश्यक असल्यास B12 पूरक आहार घ्यावा. यामुळे थकवा, मानसिक तणाव आणि चयापचयाशी संबंधित समस्या टाळता येऊ शकतात.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *