मुंबई, दिल्लीपेक्षा गुरुग्राममध्ये घरभाडे महाग

भारतातील सर्वाधिक महागड्या घरभाड्यांच्या यादीत मुंबई किंवा दिल्ली नव्हे, तर गुरुग्राम अव्वल स्थानी पोहोचले आहे. रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म मॅजिकब्रिक्सच्या २०२४ च्या अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत गुरुग्राममध्ये भाड्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.
कोविड-१९ च्या साथीनंतर शहरी भागात घरांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, गेल्या तीन वर्षांत भाड्यात तब्बल ३०% पर्यंत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. २०२५ मध्ये हा बाजार स्थिर होण्याची शक्यता आहे, परंतु मागणी आणि पुरवठा यांचे संतुलन राहिल्यासच असे घडू शकते.
आजतक हिंदीच्या अहवालानुसार, नोएडाच्या सेक्टर-१५० मध्ये देशातील सर्वाधिक म्हणजेच २२% भाडेवाढ झाली आहे. त्यानंतर गुरुग्राम, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये १६% वाढ, तर पुण्यातील एसएमआर क्षेत्रात १२.२% वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबईत तुलनेने सर्वात कमी म्हणजेच १०% पेक्षा कमी वाढ झाली आहे.

विशेषतज्ज्ञांच्या मते, भाडे दरवाढीमागे अनेक कारणे आहेत:
• शहरांतील वाढती घरांची मागणी
• नवीन गृहनिर्माण प्रकल्प आणि समकालीन संकल्पना
• मालमत्ता कर, महागाई आणि मागणी-पुरवठा तफावत

२०२३-२४ च्या घरगुती खर्च सर्वेक्षणानुसार, घरभाडे ही एक मोठी आर्थिक जबाबदारी ठरत आहे. १९९९ पासून हे प्रमाण ६.५८% पर्यंत वाढले आहे. प्रत्येक नवीन अहवालात भाडे दर वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
वाढत्या भाड्यांच्या झटक्याचा सामान्य कुटुंबांवर आर्थिक भार पडू लागला आहे. जर लवकरच यावर ठोस उपाय सापडला नाही, तर शहरांमध्ये घर भाड्याने घेणे अधिक कठीण होऊ शकते. त्यातच, गेल्या तीन वर्षांतील स्थावर मालमत्ता दरवाढीमुळे स्वतःचे घर घेणेही अधिक आव्हानात्मक ठरले आहे.
शहरी भागात वाढती भाडेवाढ ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. यावर सरकार आणि स्थानिक प्रशासनाने लवकर उपाय शोधले नाहीत, तर भविष्यात अनेक नागरिकांसाठी घर घेणे किंवा भाड्याने राहणे आणखी अवघड होऊ शकते.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *