पश्चिम रेल्वेवर शुक्रवार (११ एप्रिल) आणि शनिवार (१२ एप्रिल) रात्री मोठा ‘जंबो मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. माहीम ते वांद्रे दरम्यानच्या पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय. या कामामुळे एकूण ३३४ लोकल गाड्या रद्द होतील, तर अनेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येईल. प्रवाश्यांनी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्रवास करताना पर्यायी व्यवस्था वापरण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.
ब्लॉक – १ (११ एप्रिल, शुक्रवार रात्री)
वेळ :
• अप-डाऊन स्लो मार्ग: रात्री ११ ते सकाळी ८.३०
• अप-डाऊन फास्ट मार्ग: रात्री १२.३० ते सकाळी ६.३०
प्रमुख बदल :
• चर्चगेटकडून रात्री १०.२३ नंतर सुटणाऱ्या सर्व धिम्या लोकल फास्ट मार्गावर धावणार. या लोकल महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर थांबणार नाहीत.
• विरारहून शेवटची चर्चगेट लोकल: रात्री १२.०५
• चर्चगेट – दादर दरम्यान लोकल्स फास्ट मार्गावरून
• गोरेगाव – बांद्रा दरम्यान हार्बर मार्गावरून लोकल सेवा
• विरार – अंधेरी लोकल्स धिम्या आणि फास्ट मार्गांवरून
• शनिवारी सकाळी ६.१० वाजता भाईंदरहून पहिली चर्चगेट लोकल, सांताक्रुझ ते मुंबई सेंट्रल दरम्यान फास्ट मार्गावर
• चर्चगेटहून पहिली फास्ट लोकल बोरीवलीकडे सकाळी ६.१४ ला
• पहिली स्लो लोकल चर्चगेटहून सकाळी ८.०३ ला सुटणार
ब्लॉक – २ (१२ एप्रिल, शनिवार रात्री)
वेळ :
• अप-डाऊन धिम्या + डाऊन फास्ट मार्ग: रात्री ११.३० ते सकाळी ९
• अप फास्ट मार्ग: रात्री ११.३० ते सकाळी ८
प्रमुख बदल :
• चर्चगेट – दादर दरम्यान लोकल्स फास्ट मार्गावर धावणार
• डहाणू रोड, विरार, वसई, भाईंदरहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंतच
• चर्चगेटहून विरारची शेवटची लोकल: रात्री १०.५३
• रविवारी पहिली विरार-चर्चगेट स्लो लोकल: सकाळी ८.०८
• भाईंदर-चर्चगेट लोकल: सकाळी ८.२४
• पहिली जलद लोकल विरारहून चर्चगेटकडे: सकाळी ८.१८
• चर्चगेटहून विरारकडे पहिली जलद लोकल: सकाळी ९.०३
Leave a Reply