सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असून, कुठल्याही क्षणी काहीतरी मोठं घडू शकतं, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्डाची (NSAB) पूनर्स्थापना करण्यात आली आहे.या नव्याने गठीत झालेल्या बोर्डाचं नेतृत्व माजी ‘रॉ’ प्रमुख आलोक जोशी यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. याशिवाय, सैन्य दलातील अनुभवी आणि ज्येष्ठ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा देखील या बोर्डात समावेश करण्यात आला आहे.
या सदस्यांमध्ये –
• माजी एअर मार्शल पीएम सिन्हा (पूर्व पश्चिम एअर फोर्स कमांडर),
• लेफ्टनंट जनरल ए के सिंह (पूर्व दक्षिणी सेना कमांडर),
• रियर एडमिरल मोंटी खन्ना (नेव्ही),
• आयपीएस सेवानिवृत्त अधिकारी राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंह,
• तसेच आयएफएसमधून निवृत्त झालेले बी. वेंकटेश वर्मा यांचा समावेश आहे.
एकूण सात सदस्यीय असलेल्या या बोर्डाचे वैशिष्ट्य म्हणजे हे एक मल्टी-डिसिप्लिनरी बॉडी आहे. म्हणजेच, सरकारच्या बाहेरील, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या समितीत सहभागी असतात. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित स्थितीच विश्लेषण करणं तसच त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांच समाधान आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्लानच शिफारसी करणं हे या समितीच काम आहे
2018 नंतर प्रथमच बदल
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिक तीव्र झाला असून, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोर्डात (NSAB) महत्त्वाचे आणि रणनीतिक बदल केले आहेत. विशेष म्हणजे, 2018 नंतर प्रथमच या बोर्डाच्या रचनेत बदल करण्यात आला आहे.या नव्या पुनर्रचनेत सैन्य, आयपीएस आणि आयएफएस पार्श्वभूमीच्या सात अनुभवी सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेत महत्त्वाचे बदल केले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या सकाळपासून पाच बैठका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळपासून एकामागून एक पाच उच्चस्तरीय बैठका घेत, देशातील सुरक्षा आणि धोरणात्मक घडामोडींवर सखोल चर्चा केली. यामध्ये कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS), कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स (CCPA), कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) आणि केंद्रीय सचिवांशी सल्लामसलत अशा प्रमुख बैठकांचा समावेश होता.या सर्व बैठका सकाळी ११ वाजता पंतप्रधान निवासस्थानी सुरू झाल्या आणि तिन्ही तासांहून अधिक काळ चालल्या.विशेष म्हणजे, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी २३ एप्रिल रोजी सीसीएसची तातडीची बैठक घेतली होती.
Leave a Reply