• चौंडीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; सभापती राम शिंदेंनी असं केलं नियोजन

    चौंडीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; सभापती राम शिंदेंनी असं केलं नियोजन

    अहिल्यानगर : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी गावात पार पडणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी‎वर्षानिमित्त ही बैठक चौंडीत आयोजित करण्यात आली आहे. बहुतांश मंत्री अहिल्या नगर येथील शासकीय ‎विश्रामगृहावर मुक्कामीसाठी पहिलंच आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री, ‎उपमुख्यमंत्र्यांसाठी चौंडीत विश्रांती कक्ष, दोन ‎किमीवर वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली…

  • राज्यावर पाणीटंचाईचं संकट; 2 हजार 997 प्रकल्पातील पाणीसाठा 33 टक्क्यांवर

    राज्यावर पाणीटंचाईचं संकट; 2 हजार 997 प्रकल्पातील पाणीसाठा 33 टक्क्यांवर

    राज्यात पाणीटंचाई भेडसावत आहेत. कारण राज्यातील २ हजार ९९७ प्रकल्पात ३३ टक्के पाणीसाठा उरला आहे. तब्बल ३ हजार १५ गावं, वाड्यांची तहान टँकर्सने भागवली जात आहे. तसेच तापमानामुळे पाणीपातळी आणखी खालावण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाईचं संकट राज्यात घोंगवत आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली तशी टँकरची संख्या वाढत आहे. वेगाने वाढणारी टँकरची…

  • अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दिलासा

    अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दिलासा

    अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. बदलापूर येथील शाळेत बालकांवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. चौकशीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र उच्च न्यायालयाच्या या आदेशाच्या विरोधात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका…

  • निधीवरून राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत धुसफूस; शिरसाटांची नाराजी तर मुश्रीफ यांनी लगावला टोला

    निधीवरून राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत धुसफूस; शिरसाटांची नाराजी तर मुश्रीफ यांनी लगावला टोला

    उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि शिंदेसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यात निधीवरून धुसफूस पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे 400 कोटी निधी महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग केल्यामुळे या विभागाचा पहिला क्रमांक आला, अशी मिश्किल टिपण्णी संजय शिरसाठ यांनी केली आहे.…

  • मुंबईवर पाणी कपातीचे संकट; 23 टक्के जलसाठा उरला

    मुंबईवर पाणी कपातीचे संकट; 23 टक्के जलसाठा उरला

    मुंबईवर पाणी कपातीचे संकट घोंगावत आहे. त्याचं कारण म्हणजे मुंबईत मे महिन्यात फक्त 23 टक्के जलसाठा उरला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने राज्य सरकारकडे अतिरिक्त पाण्यासाठी मागणी केली आहे. सरकारने २,३०,५०० दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा देण्यास तत्त्वतः मान्यता…

  • भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांची आता खैर नाही;  संपत्ती तपासली जाणार : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांची आता खैर नाही; संपत्ती तपासली जाणार : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    आता भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची काही खैर नाही, असंच म्हणावं लागेल. त्याचे कारण म्हणजे, भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांची सर्व्हिसदरम्यान संपत्ती कितो वाढली, हे तपासणार असल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले आमच्या सरकारमध्ये पैसे घेऊन काम करणे असे चालणार नाही. राज्यात अनेक भ्रष्ट अधिकारी आहेत ज्यांना अँटी करप्शन…

  • शेतकऱ्यांना रात्रीच्याऐवजी दिवसा लाईट मिळणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

    शेतकऱ्यांना रात्रीच्याऐवजी दिवसा लाईट मिळणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

    सध्या दिवसा लोडशेडिंग असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यायला जावं लागतं. रात्रीच्या अंधारात हिंस्त्र प्राण्यांसह इतर संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणून शेतकऱ्यांना रात्रीच्याऐवजी दिवसा लाईट देणार असल्याचं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले. अजित पवार संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज येथे संवाद उद्योजकांशी या कार्यक्रमाचे आयोजन…

  • “भूतकाळात काँग्रेसने अनेक चुका केल्या, त्याची जबाबदारी मी स्वीकारतो”; राहुल गांधींची कबुली

    “भूतकाळात काँग्रेसने अनेक चुका केल्या, त्याची जबाबदारी मी स्वीकारतो”; राहुल गांधींची कबुली

    ”काँग्रेसने भूतकाळात अनेक चुका केल्या आहेत, त्याची जबाबदारी मी स्वीकारतो”, असे विधान काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे.अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी 21 एप्रिल रोजी ब्राऊन विद्यापीठात एका संवाद सत्रात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. माजी पंतप्रधान तथा त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्या…

  • बारावीचा निकाल जाहीर; पासिंग टक्केवारी घसरली तर कोकणाने पुन्हा मारली बाजी

    बारावीचा निकाल जाहीर; पासिंग टक्केवारी घसरली तर कोकणाने पुन्हा मारली बाजी

    राज्यात आज दुपारी (सोमवारी) 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (बारावी) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. राज्यात 91.88 विद्यार्थी पास झाले असून यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. यावर्षी पासिंग टक्केवारी थोडीशी घसरून ९१.८८% वर आली आहे. मागील वर्षीच्या ९३.३७% उत्तीर्णतेच्या टक्केवारीच्या तुलनेत, या वर्षीच्या निकालात…

  • हवामान विभागाकडून मुंबईसह शेजारच्या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी

    हवामान विभागाकडून मुंबईसह शेजारच्या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी

    देशाच्या अनेक भागात वादळी हवामान असताना, भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारपासून मुंबई आणि त्याच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी केला आहे. वादळांसह हलक्या ते मध्यम सरी आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पूर्व-मान्सूनच्या पावसामुळे दिवसाच्या उष्णतेच्या पातळीतही घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान जवळजवळ ३१ अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज…